Coronavirus In Maharashtra: राज्यात करोनाचा धोका अजून टळलेला नाही; ‘ही’ आहे आजची आकडेवारी

हायलाइट्स:

  • राज्यात आज १७७ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू.
  • दिवसभरात ६ हजारावर नवीन रुग्णांचे निदान.
  • अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ७४ हजार ३१८ इतकी.

मुंबई: राज्यात करोना संसर्गाची दुसरी लाट नियंत्रणात येत असली तरी दैनंदिन रुग्णसंख्या अजूनही अपेक्षित प्रमाणात कमी झालेली नाही. राज्यात गेल्या २४ तासांत ६ हजार ५ नवीन रुग्णांची भर पडली आहे तर त्याचवेळी ६ हजार ७९९ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. करोनाने आज आणखी १७७ रुग्ण दगावले असून राज्यातील मृत्यूदर सध्या २.१ टक्के इतका आहे. ( Coronavirus In Maharashtra Latest Updates )

वाचा:ठाण्यासाठी करोनाची नवी नियमावली जाहीर; पाहा, कुठे मिळाला दिलासा!

राज्यात करोना पॉझिटिव्हिटी रेट आणि दैनंदिन रुग्णसंख्या कमी असलेल्या जिल्ह्यांना दिलासा देण्यात आला आहे. मुंबई महापालिका क्षेत्र व २२ जिल्ह्यांमधील निर्बंध आजपासून मोठ्या प्रमाणात शिथील करण्यात आले आहेत. त्याचवेळी ११ जिल्ह्यांमध्ये मात्र लेव्हल तीनचे निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. यात पुणे आणि अहमदनगरसह कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा समावेश असून तेथील रुग्णवाढ आणि पॉझिटिव्हिटी रेट याबाबत चिंता कायम आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या २४ तासांतील करोनाचे आकडे राज्याच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आले असून राज्याची दैनंदिन रुग्णसंख्या तुलनेत अजूनही मोठीच असल्याचे दिसत आहे.

वाचा: मंत्रिमंडळ बैठक: ठाकरे सरकारने घेतले ‘हे’ चार महत्त्वाचे निर्णय

अशी आहे राज्यातील आजची स्थिती

– राज्यात आज १७७ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू
– सध्या राज्यातील करोना मृत्यूदर २.१ % एवढा.
– दिवसभरात राज्यात ६,००५ नवीन रुग्णांचे निदान.
– आज ६,७९९ रुग्ण करोनावर मात करून परतले घरी
– आजपर्यंत एकूण ६१,१०,१२४ करोना बाधित रुग्ण झाले बरे.
– राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.६६ % एवढे.
– आतापर्यंत ४,८५,३२,५२३ कोविड चाचण्या पूर्ण.
– एकूण नमुन्यांपैकी ६३,२१,०६८ (१३.०२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह.
– सध्या राज्यात ४,५१,९७१ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये.
– तीन हजार नऊ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये.
– राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ७४ हजार ३१८ इतकी.
– सर्वाधिक १५ हजार ५५२ अॅक्टिव्ह रुग्ण पुणे जिल्ह्यात.
– मुंबईतील अॅक्टिव्ह रुग्णसंख्या सध्या ४ हजार ९९६ इतकी.

वाचा: राज्यातील पूरग्रस्तांसाठी ११ हजार ५०० कोटींचं पॅकेज जाहीर

Source link

Coronavirus In Maharashtra Latest Updatescoronavirus in maharashtra today casescoronavirus in maharashtra today newsmaharashtra coronavirus latest updateMaharashtra coronavirus updateकरोनाकरोना पॉझिटिव्हिटी रेटकोविडपुणेमुंबई
Comments (0)
Add Comment