BSNL च्या या वार्षिक प्लानची किंमत १९९९ रुपये आहे. हा एक अनलिमिटेड प्लान आहे. या प्लानमध्ये ६०० जीबी डेटा मिळतो. सोबत सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग मिळते. बीएसएनएलच्या या प्लानमध्ये रोज १०० एसएमएस सोबत नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा मिळते. या प्लानची वैधता ३६५ दिवसाची आहे. यासोबत PRBT, लोकधुन कंटेंट आणि Eros Now चे सब्सक्रिप्शन ३० दिवसासाठी मिळते.
वाचाः ८४ दिवसाची वैधता, रोज २.५ जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग, पाहा स्वस्त रिचार्ज प्लान
बीएसएनएलकडे आणखी एक २ हजार ९९९ रुपये किंमतीचा प्लान आहे. ज्यात रोज ३ जीबी डेटा मिळतो. या प्लान सोबत ३६५ दिवसाची वैधता मिळते. या प्लानमध्ये रोज १०० एसएमएस आणि सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग मिळते.
वाचाः iPhone 15 मध्ये USB Type-C देवून Apple ने असा केला गेम, यूजर्स झाले नाराज
SNL 4G संबंधी जाणून घ्या
SNL 4G वरून दूरसंचार विभाग (DoT) ने भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) ला ४जी साठी नंबरिंग संसाधन बहाल केले आहे. डॉटने टेलिकॉमला ४ जी सेवेसाठी व्यवसायिक लाँच मध्ये मदत करण्यासाठी बीएसएनएल नंबरिंग संसाधनाकडे सोपवले आहे. बीएसएनएलची ४जी सेवा यावर्षीच्या अखेरपर्यंत लाँच केली जावू शकते.
वाचाः Jio यूजर्सची मजा, फक्त ९१ रुपयात २८ दिवस चालणार हा प्लान, ३ जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग
वाचाः Valentine Day offer : व्हॅलेंटाइन डे दणक्यात साजरा करा, Vi देत आहे फ्री डेटा