नताशा फक्त १३ वर्षांची
साधारण १३ वर्षांची असलेली नताशा पेरियानयागम ही न्यू जर्सी येथील फ्लोरेन्स एम गौडीनर मिडल स्कूलची विद्यार्थिनी आहे. तिने स्प्रिंग २०२१ मध्ये जॉन्स हॉपकिन्स सेंटर फॉर टॅलेंटेड युथ (CTY) देखील दिली होती. त्यावेळेस ती ग्रेड ५ ची विद्यार्थीनी होती. ७६ देशांतील १५ हजारहून अधिक विद्यार्थ्यांच्या उच्च-श्रेणी-स्तरीय चाचण्यांच्या निकालांच्या आधारे ही यादी तयार करण्यात आली आहे.
जॉन्स हॉपकिन्स सेंटर फॉर टॅलेंटेड युथ (CTY) संस्थेने जगभरातील तेजस्वी विद्यार्थ्यांची शैक्षणिक क्षमता ओळखण्यासाठी ग्रेड स्तरावरील चाचणी घेतली. अॅडव्हान्स ग्रेड-८ पर्यंत पोहोचण्यासाठी ९० टक्क्यांसहित शाब्दिक आणि परिमाणात्मक विभागातील निकाल महत्वाचा होता. यासर्व गुणांमुळेच नताशा पेरियानयागमला यादीत स्थान मिळाले.
यावर्षी सीटीवाय टॅलेंट सर्चचा भाग म्हणून घेतलेल्या SAT, ACT, शाळा आणि महाविद्यालयीन क्षमता चाचणी किंवा तत्सम मूल्यमापनांमध्ये विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आल्याची माहिती विद्यापीठाकडून देण्यात आली आहे.
तिला डूडलिंग आणि जेआरआर टॉल्कीनच्या कादंबऱ्या वाचायला आवडतात, असे चेन्नईचे रहिवासी असलेल्या नताशा पेरियानयागमच्या पालकांनी सांगितले.
आमच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेतील यशाची ही केवळ ओळख नाही, तर त्यांच्या शोध आणि शिकण्याच्या प्रेमाला आणि त्यांच्या तरुण आयुष्यात त्यांनी आतापर्यंत जमा केलेल्या सर्व ज्ञानाला आमचा सलाम आहे, अशी प्रतिक्रिया सीटीवायचे कार्यकारी संचालक डॉ. एमी शेल्टन यांनी दिली. हे विद्यार्थी त्यांच्या आवडींचा शोध घेण्यासाठी, समृद्ध अनुभवांमध्ये गुंतण्यासाठी आणि त्यांच्या समुदायात आणि जगात उल्लेखनीय गोष्टी साध्य करण्यासाठी त्या क्षमतेचा वापर करतील अशा सर्व मार्गांचा विचार करणे रोमांचक असल्याचेही ते पुढे म्हणाले.
अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा