SSC HSC Exam: दहावी, बारावी परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी ‘तो’ निर्णय रद्द

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने यंदापासून दहावी, बारावी परीक्षेसाठी प्रश्नपत्रिकांचे वितरण दहा मिनिटे अगोदर करण्याचा निर्णय रद्द केला. परीक्षा दालनात सकाळच्या सत्रात ११ आणि दुपारच्या सत्रात तीन वाजता प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना वितरीत करण्यात येईल. पेपरफुटी, गैरप्रकारात सोशल मीडिया वापर अशा घटना लक्षात घेऊन बदल करण्यात आल्याचे सांगण्यात येते.

विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका निर्धारित वेळेच्या दहा मिनिटे अगोदर दिली जात होती. त्यामुळे विद्यार्थ्यांना निर्धारित वेळेपूर्वी प्रश्न समजण्यास मदत होत असे. परंतु अनेकदा प्रश्नपत्रिका सोशल मीडियावरून व्हायरल झाल्याच्या घटना समोर आल्या. अशा घटनांचा विचार करून यंदापासून नियमात बदल करण्याचा मंडळाने निर्णय घेतला. फेब्रुवारी-मार्च २०२३ परीक्षेत आता निर्धारित वेळेपूर्वी दहा मिनिटे अगोदर मिळणारी प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांच्या हाती निर्धारित वेळेप्रमाणेच मिळणार आहे.

दहावी, बारावीची परीक्षा दोन सत्रांत घेण्यात येते. ज्यामध्ये सकाळचे सत्रातील परीक्षा ११ वाजता तर दुपारच्या सत्रातील परीक्षा तीन वाजता सुरु होते. आता सकाळच्या सत्रातील विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका परीक्षा दालनात ११ वाजता, तर दुपारच्या सत्रात तीन वाजता प्रश्नपत्रिकांचे वितरण होईल. त्यामुळे पेपरफुटीला आळा बसेल, असे सांगण्यात येते. माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणारी बारावीची लेखी परीक्षा २१ फेब्रुवारी तर दहावीची लेखी परीक्षा २ मार्च पासून घेण्यात येणार आहे.

MahaCet: परदेशी विद्यार्थ्यांसाठी नवे प्रवेश पोर्टल

बदलामुळे नियंत्रण!

परीक्षा कॉपीमुक्त वातारवणात होण्यासाठी राज्य मंडळ विविध उपाययोजना करीत आहे. त्याचाच एक भाग असल्याचे सांगण्यात येते. मंडळाने म्हटले आहे, ‘दहावी-बारावी हा विद्यार्थ्यांच्या जीवनातील एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. विद्यार्थ्यांचा परीक्षेचा ताण कमी करण्यासाठी दहा मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका पाच ते सहा वर्षांपासून देण्यात येत होती. परंतु प्रश्नपत्रिका व्हायरल झाल्याचे निदर्शनास आले आहे. अशा घटनांना आळा घालून परीक्षा भयमुक्त आणि कॉपीमुक्त वातावरणात व्हाव्यात, यासाठी हा बदल करण्यात आला आहे.’

दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; परीक्षेसाठी बोर्डाने जारी केले नवे नियम
आयआयटीसह एनआयटी, ट्रीपल आयटीसाठी बारावी मंडळाच्या गुणांना महत्व

Source link

Cancellation decisionHSC Exammaharashtra state boardmaharashtra state board of secondary educationMaharashtra Timesquestion paperssecondary and higher secondary educationssc and hsc board exam 2023ssc and hsc exam 2023SSC Examssc hsc board exam newsssc hsc board maharashtraदहावी परीक्षाबारावी परीक्षा
Comments (0)
Add Comment