खरं तर इरफान हा गुरे तस्करीच्या एका गुन्ह्यात फरार होता. याप्रकरणी जिल्ह्यातील देवलापार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. देवलापार पोलीस ठाण्याचे ३ पोलीस आणि कपिल नगर पोलीस स्टेशनचे ३ पोलीस त्याला अटक करण्यासाठी त्याच्या घरी गेले होते. पोलीस आल्याचे पाहताच इरफानने घराच्या दुसऱ्या मजल्यावरून थेट खाली उडी घेतली. यामध्ये तो गंभीर जखमी झाला होता.
त्यानंतर कुटुंबीयांनी त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, सोमवारी रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. पोलीस कर्मचारी जखमी इरफानला सोडून परत गेल्याचा आरोपही कुटुंबीयांनी केला आहे.
पोलिसांनी त्याला त्यांच्या वाहनातून हॉस्पिटलमध्ये नेले असते तर त्याचा जीव वाचू शकला असता असंही त्यांनी सांगितलं. तसेच, संतप्त नागरिकांनी कपिल नगर पोलीस स्टेशनमध्ये एकत्र येऊन नाराजी व्यक्त केली आहे आणि त्याच्या मृत्यूसाठी त्याला अटक करण्यासाठी आलेल्या पोलिसांवर आरोप केले आहेत.