भरधाव डंपर वेफर्सच्या दुकानात घुसला, एकाने जीव गमावला; जळगावात धडकी भरवणारा अपघात

जळगाव: जळगाव – औरंगाबाद महामार्गावर भरधाव वेगाने जात असलेल्या डंपरवरुन चालकाचा ताबा सुटला आणि भरधाव डंपर रस्त्यालगतच्या केळी वेफर्सच्या दुकानावर जावून धडकला. दुकानावर धडकल्यानंतर हा डंपर पलटी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत डंपरखाली दबून डंपरमध्ये असलेल्या एकाचा मृत्यू झाला आहे. तर केळीच्या दुकानातील एक तरुणी आणि दुकानाजवळ चहा पीत असलेला एक जण जखमी झाला आहे. तर एक दुचाकी सुध्दा चक्काचूर झाली आहे. सोमवारी दुपारी जामनेर गावानजीक भवानी फाट्याजवळ हा भीषण अपघात घडला आहे. या अपघातामुळे याठिकाणी उपस्थित सर्वांच्या काळजाचा ठोकाच चुकला होतां. या अपघातात परमेश्वर प्रकाश आधारे (वय-२२) याचा मृत्यू झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सोमवारी दुपारी जळगावकडे एमएच १९ सीवाय ५९१५ या क्रमाकांचे रिकामे डंपर भरधाव वेगाने जात होते. यात जामनेरनजीक जळगाव औरंगाबाद महामार्गावर भवानी फाट्याजवळ डंपर चालकाचा डंपरवरील ताबा सुटला. यात हा भरधाव डंपर रस्ताच्याकडेला असलेल्या केळीच्या वेफर्स दुकानाला धडक देऊन पलटी झाला.

स्लो पॉयझन द्यायची, माझं शरीर काळ पडलं; पत्नीचं अफेअरने हितेश असह्य… अन् मग आक्रित घडलं
या अपघातात डंपरवरील दोघांपैकी परमेश्वर प्रकाश आधारे हा डंपरखाली दाबला गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तसेच, केळीच्या वेफर्सच्या दुकानाजवळ चहा पिण्यासाठी थांबलेला एक जण जखमी झाला असून त्याला पुढील उपचारासाठी जळगावला हलवण्यात आले आहे. तसेच, केळी वेफर्सच्या दुकानात काम करणारी अश्विनी प्रल्हाद भोई (वय-१९) ही तरूणीदेखील गंभीर जखमी झाली आहे. या अपघातात याठिकाणी उभी असलेल्या एमएच ४१ बीबी २७३५ या क्रमाकांच्या दुचाकीचाही चुराडा झाला.

ज्या केळीच्या वेफर्सच्या दुकानावर जावून हा डंपर धडकला ते दुकान भुसावळ तालुक्यातील सुनसगाव येथील संतोष भोई यांचे आहे. त्यांचा संपूर्ण उदरनिर्वाह हा केळी वेफर्सच्या दुकानावर आहे. या अपघातात भोई यांच्या दुकानाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तर गंभीर जखमी झालेली अश्विनी भोई त्यांची मुलगी असून ती बारावीची विद्यार्थिनी आहे.
पैज लागली! १० मिनिटांत ३ क्वॉर्टर दारू संपवली; आयुष्याची बाजी लावून तरुण जिंकला, पण…
२१ फेब्रुवारीपासून बारावीच्या परीक्षांना प्रारंभ होत आहे, मात्र या परीक्षेपूर्वी तिच्यावर अपघाताच्या रुपाने शारीरिक आणि मानसिक संकट ओढवले आहे. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पहूर पोलीसानी घटनास्थळी भेट देऊन जेसीबीच्या सहाय्याने पलटी झालेल्या डंपरला बाजुला केला आणि गाडीखाली दबलेल्या तरुणाला बाहेर काढण्यात आले. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर परिसरातील गावांमधील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. याप्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल प्रदीप चौधरी करीत आहे.

Source link

dumper vehicle thrashed in shopjalgaon accident newsjalgaon latest newsjalgaon newsjalgaon terrible accidentone lost life in accidentterrible accident in jalgaonजळगाव अपघातजळगाव न्यूजजळगाव भीषण अपघात
Comments (0)
Add Comment