मोठमोठ्या सभा गाजवणारे मोदी राहुल गांधीच्या प्रश्नांना उत्तर का देऊ शकले नाहीत: सामना

Rahul Gandhi speech in parliament | राहुल गांधी यांनी संसदेतील आपल्या भाषणात पंतप्रधान मोदी यांना अदानींच्या मुद्द्यावरुन घेरले होते. मात्र, मोदींनी काँग्रेसच्या काळातील भ्रष्टाचाराच्या प्रकरणांचा उल्लेख करत मूळ विषयाला बगल दिली होती.

 

हायलाइट्स:

  • गेली सात-आठ वर्षे राहुल गांधी हे भाजपच्या खिजगणतीत नव्हते
  • आता त्यांनी ‘राहुल’ नामाचा धसकाच घेतला आहे
मुंबई: राहुल गांधी यांनी संसदेत अदानी-हिंडेनबर्गच्या मुद्द्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करताना भाजपवर आसूड ओढले होते. यानंतर राहुल गांधी यांना लोकसभा सचिवालयाने विशेषाधिकार भंगाची नोटीस पाठवली होती. या मुद्द्यावरुन शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून मोदी सरकारवर ताशेरे ओढण्यात आले आहेत. राहुल गांधींच्या भाषणामुळे भाजपचा चेहरा संसदेत पिवळा पडला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हजरजबाबी आहेत. मोठमोठ्या सभा, आंतरराष्ट्रीय मंच गाजवून सोडतात. मग स्वत:च्या लोकसभेत अत्यंत किरकोळ वाटणाऱ्या राहुल गांधी यांच्या प्रश्नांना ते का उत्तरं देऊ शकले नाहीत, असा सवाल सामनातून भाजपला विचारण्यात आला आहे.

या भाषणात राहुल गांधी यांनी जे प्रश्न उद्योगपती अदानी- मोदी संबंधांबाबत निर्माण केले, त्यावर उत्तर देण्याचे टाळून पंतप्रधान मोदी फक्त ‘इधर उधर की बातें’ करीत राहिले. गेली सात-आठ वर्षे राहुल गांधी हे भाजपच्या खिजगणतीत नव्हते. आता त्यांनी ‘राहुल’ नामाचा धसकाच घेतला आहे. राहुल गांधी यांनी मोदी सरकारची बोटेच छाटली व ते दुखरे हात तोंडावर ठेवून भाजपवाले बोंबा मारीत आहेत. मुळात ‘अदानी मोदी’ प्रकरणात देशाची नाचक्कीच झाली आहे. पण भाजप त्याबाबत डोळ्यावर पट्टी व तोंडावर बोट ठेवून आहे, अशी टीका ‘सामना’तून करण्यात आली आहे.
PM Modi : मोदींच्या ‘त्या’ वाक्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांचा चेहरा खर्रकन उतरला, राहुल गांधी बघतच राहिले…
२०१४ मध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता आल्यानंतरच अदानी हे श्रीमंतीच्या शिखरावर पोहोचले. “फक्त एकाच उद्योगपतीच्या पाठीशी पंतप्रधान संपूर्ण ताकद कशी काय लावू शकतात?” असा प्रश्न राहुल गांधी यांनी विचारला. हा पंतप्रधानांच्या अवमानाचा विषय कसा होऊ शकतो? देशातील विमानतळांपासून सफरंचदाच्या व्यापारापर्यंत सर्वत्र अदानी याच एकमेव नावाची चर्चा आहे. पंतप्रधान मोदी व अदानी समूहात नेमके काय नाते आहे, राहुल गांधींच्या प्रश्नावर भाजपच्या संसदीय कार्यमंत्र्यांनी राहुल गांधी यांची तक्रार केली. वास्तविक अशा तक्रारी आणि नोटिसा फडफडवण्यापेक्षा पंतप्रधान मोदींना राहुल गांधी यांना उत्तर द्यायला हवे होते. मोठमोठ्या सभा गाजवणाऱ्या हजरजबाबी मोदींना ही गोष्ट का जमली नाही, असा खोचक सवाल ‘सामना’तून उपस्थित करण्यात आला आहे.
PM Modi speech: मोदींची काँग्रेसवर सडकून टीका, पण अदानींबद्दल चकार शब्द नाही; राहुल म्हणाले, शॉक बसलाय!
राहुल गांधी यांनी ‘देशाची ‘मन की बात’ संसदेत मांडली. जगभरात सध्या मोदी अदानी संबंधाची राळ उडाली आहे. अदानीच्या कंपन्यांचा भाव कोसळला आहे. राष्ट्रपतींच्या भाषणावर, धन्यवाद प्रस्तावावर बोलताना राहुल गांधींनी सरळसोट मुद्दे उपस्थित केले. “आधी मोदी अदानींच्या विमानातून सफर करीत होते. आता अदानी मोदींच्या विमानातून सफर करताना दिसतात. हा मामला आधी गुजरातचा होता. मग भारताचा झाला व आता आंतरराष्ट्रीय झाला. अदानी यांनी गेल्या २० वर्षांत इलेक्टोरल बॉण्डच्या मार्फत भाजपला किती पैसे दिले?” हा हिशेब मागताच भाजपवाल्यांची तोंड पाहण्यासारखी झाली होती, अशी टिप्पणी सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आली आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Source link

budget session 2023 best speechesMaharashtra politicspm modi speech in parliamentPM Narendra ModiRahul Gandhirahul gandhi speech in parliamentSaamana editorialराहुल गांधी vs नरेंद्र मोदी
Comments (0)
Add Comment