अमेयने ढकललं नाही, मीच घसरुन पडले असेन; ‘जीव घेण्याच्या प्रयत्न’ प्रकरणी प्रियांगीचा दावा

मुंबई : २५ वर्षीय मैत्रिणीला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपी अमेय दरेकर याच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रातून पोलिसांनी अमेयची आई राधिका दरेकर यांचे नाव वगळले आहे. मालाडमधील बीपीओची कर्मचारी असलेल्या प्रियांगी सिंगला १२ नोव्हेंबर रोजी अमेयने जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. तर प्रियांगीने मात्र आपल्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचं आठवत नसल्याचं म्हटलं आहे.

दरम्यान, पुढील तपासात गुन्ह्यात अमेयच्या आईची गुन्ह्यात भूमिका उघड झाल्यास राधिका दरेकर यांचे नाव पुरवणी आरोपपत्रात दिले जाईल, असे दहिसर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांनी सांगितले. राधिका दरेकर यांची अटकपूर्व जामीन याचिका मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित आहे.

१२ नोव्हेंबर २०२२ रोजी दहिसरमधील टोलेजंग इमारतीच्या गच्चीवर मद्यपान केल्यानंतर आपला प्रियांगीसोबत वाद झाला. दारुच्या नशेत ओव्हरहेड टँकवरुन आपण तिला खाली ढकलले, अशी कबुली अमेयने दिल्याचा उल्लेख दिंडोशी सत्र न्यायालयात दाखल आरोपपत्रात आहे.

पोलिसांनी आरोपपत्रात ४० साक्षीदारांच्या जबाबांचा समावेश केला आहे. याशिवाय दारुच्या बाटल्या, कपडे आणि रक्ताचे नमुनेही पुरावा म्हणून न्यायालयासमोर सादर करण्यात आले आहेत.

पाण्याच्या टाकीवरुन खाली पडल्यानंतर प्रियांगीला झालेल्या जखमांवर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी गेल्या आठवड्यात तिचा जबाब नोंदवला असून प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर पुरवणी जबाब नोंदवला जाईल, असे आरोपपत्रात म्हटले आहे.

अमेयचा मित्र दहिसरमधील एका टोलेजंग इमारतीत राहतो. १२ नोव्हेंबर रोजी या इमारतीच्या गच्चीवर अमेय आणि प्रियांगी यांनी एकत्र रात्र घालवली. दुसऱ्या दिवशी सकाळी अमेय प्रियांगीला बोरिवलीमधील स्वतःच्या घरी घेऊन आला. त्यानंतर अमेयच्या आईने तिला दिंडोशीमधील तिच्या राहत्या घरी सोडले. त्यावेळी ती बेुद्धावस्थेत होती, तर तिचे कपडेही भिजलेले होते. कामवालीकडे प्रियांगीला सुपूर्द करताना तिने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा दावा अमेयच्या आई राधिका दरेकर यांनी केला होता.

प्रियांगीचे आई-वडील मॉर्निंग वॉक करुन घरी परतले, तेव्हा आपल्या लेकीची अवस्था पाहून त्यांना मोठा धक्का बसला. त्यांनी तिला तात्काळ रुग्णालयात दाखल केलं. प्रियांगीच्या वडिलांनी दिंडोशी पोलिसात तक्रार दाखल केली. अमेयने प्रियांगीला पाण्याच्या टाकीत ढकलून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला, तर त्याच्या आईनेही तिला मारहाण केली, असा आरोप तक्रारीत करण्यात आला होता.

जागा बघायला आली नि कॉटेजवर घेऊन गेली, अलिबागमध्ये हनिट्रॅप, मुंबईत महिला जाळ्यात
अमेय आणि त्याच्या आईवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला. नंतर हे प्रकरण दहिसर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आले. दोन दिवसांनी म्हणजे १४ नोव्हेंबर रोजी पोलिसांनी अमेयला अटक केली. तो सध्या ठाणे तुरुंगात न्यायालयीन कोठडीत आहे.

तरुणीच्या ‘त्या’ इच्छेमुळे कॉलबॉय वैतागला, न्यूड फोटो बाहेर, सोलापुरात तरुणावर गुन्हा
प्रियंगीने दहिसर पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे की, आपण कसे जखमी झालो, हे आपल्याला नीट आठवत नाही. मात्र अमेयने आपल्याला ढकलले असेल, असा तिला वाटत नव्हते. दारूच्या नशेत कदाचित पाण्याच्या टाकीवरून पाय घसरून आपण खाली पडलो असावो, असं तिचं म्हणणं आहे. अमेय किंवा त्याच्या आईने जीवे मारण्याचा किंवा जखमी करण्याचा प्रयत्न केला, असे मला आठवत नसल्याचंही प्रियांगी म्हणाली.

गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारली, अजित दादांच्या ‘त्या’ विधानाची चर्चा

Source link

amey darekarattempt to murdermaharashtra crime newsmumbai crime newsmumbai girlfriend boyfriendmumbai malad bpo employee casepriyangi singhअमेय दरेकरप्रियांगी सिंगमुंबई प्रेयसी हत्येचा प्रयत्न
Comments (0)
Add Comment