Devendra Fadnavis Education: महाराष्ट्राच्या राजकारणातील ‘चाणक्य’ देवेंद्र फडणवीस यांचे शिक्षण जाणून घ्या

Devendra Fadnavis Education:राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy CM Devendra Fadnavis) यांचा आज वाढदिवस आहे. देवेंद्र गंगाधर फडणवीस हे महाराष्ट्राचे १८ वे मुख्यमंत्री आहेत. फडणवीस यांचा जन्म २२ जुलै १९७० रोजी नागपूर येथे झाला. महाविकास आघाडीच्या काळात सक्षम विरोधी पक्षनेता म्हणून त्यांनी भूमिका बजावली. तर सध्या ते उपमुख्यमंत्री म्हणून कार्यभाग संभाळत आहेत. त्यांच्या शैक्षणिक कारकिर्दीविषयी जाणून घेऊया.

देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे शालेय शिक्षण (Devendra Fadnavis Education Details) नागपूर शंकर नगर चौक येथील सरस्वती विद्यालयातून पूर्ण केले.

नागपूरच्या शासकीय विधी महाविद्यालयातून त्यांनी पाच वर्षांच्या लॉ पदवीसाठी प्रवेश घेतला.

१९९२ मध्ये त्यांनी लॉ पदवी मिळविली.

Ajit Pawar Education: भल्याभल्या राजकारण्यांची ‘शाळा’ घेणारे अजित पवार कितवी शिकले माहितेय का?
बिझनेस मॅनेजमेंटमध्ये त्यांनी पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेतले.

जर्मनीतील डीएसई बर्लिन या संस्थेत डिप्लोमा इन मेथड्स अंण्ड टेक्निक्स ऑफ प्रोजेक्ट मॅनेजमेंट हा डिप्लोमा मिळविला.

देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून केली होती.

वयाच्या २२ व्या वर्षी ते नागपूर महापालिकेचे महापौर झाले.

देवेंद्र फडणवीस हे अभाविपचे सक्रिय सदस्य होते.

वयाच्या ४४ व्या वर्षी शरद पवार यांच्यानंतर ते महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री ठरले. ३१ ऑक्टोबर २०१४ रोजी त्यांनी वानखेडे स्टेडियम, मुंबई येथे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. कुशल युवा राजकारणी, स्वच्छ प्रतिमा, अभ्यासु वृत्ती, आर्थिक धोरणांसह अनेक विषयांचा त्यांचा व्यासंग उत्तम आहे.

Source link

deputy cm devendra fadnavisDevendra Fadnavisdevendra fadnavis birthdaydevendra fadnavis birthday educationdevendra fadnavis careerदेवेंद्र फडणवीस शिक्षणराज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Comments (0)
Add Comment