प्रतिसाद देत नाही म्हणून दरवाजा तोडला, समोर पोलिसाला नको त्या स्थितीत पाहून वेटर हादरले…

यवतमाळ : शहरातील मकरंद हॉटेलमध्ये ३४ वर्षीय पोलीस कर्मचारी मृतावस्थेत आढळल्याने एकच खळबळ उडाली. ही घटना सोमवार, १३ फेब्रुवारीला सकाळी ११ वाजताच्या सुमारास दत्त चौक परिसरात उघडकीस आली. मांगीलाल नामदेव चव्हाण (३४) रा. शेलू बु, ता. पुसद असे मृत पोलिस कर्मचाऱ्याचे नाव असून तो यवतमाळ शहर पोलिस ठाण्यात कार्यरत असल्याचे पोलिस सुत्रांकडून सांगण्यात येत आहे.

पुसद तालुक्यातील शेलू बु येथील पोलिस कर्मचारी मांगीलाल चव्हाण हे वडगाव जंगल पोलिस ठाण्यात कार्यरत होते. काही दिवसापूर्वीच त्यांची बदली त्या ठिकाणाहून यवतमाळ शहर येथे करण्यात आली होती. गावाला दररोज जाणे शक्य नसल्याने तो शहरातील दत्त चौक परिसरात असलेल्या मकरंद हॉटेलमध्ये रूम घेऊन राहत होता. अश्यात सोमवार, १३ फेब्रुवारीला सकाळी पोलिस कर्मचारी मांगीलाल हे हॉटेलमधील रूममध्ये मृतावस्थेत आढळून आले. घटनेची माहिती हॉटेलमधील कर्मचाऱ्यांना कळताच एकच खळबळ उडाली.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेता अवधुतवाडी पोलिस ठाण्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहाणी केली. दरम्यान घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीकरीता जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल केला.

मेहंदीच्या कार्यक्रमात भेट, पाहताक्षणी प्रेमात, हिंदू-मुस्लिम धर्म विसरले, माणुसकी धर्माने रबाना-अमोलला एकत्र आणलं!
दरम्यान, या प्रकरणी अवधुतवाडी पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून मृत्यूचे कारण अद्याप समोर आलेलं नाही. या प्रकरणाचा पुढील तपास अवधुतवाडी पोलीस ठाण्याचे ठाणेदार मनोज केदारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करीत आहे.

जातीमुळे लग्नाला नकार, दोघांनी झोपेच्या १५ गोळ्या घेतल्या, त्यातून वाचले, घरच्यांनी लग्न लावलं..!

  • पोलीस कर्मचाऱ्याचं नाव- मांगीलाल नामदेव चव्हाण
  • आधीचं पोलीस स्टेशन- जंगल पोलिस ठाणे
  • बदली झालेलं पोलीस स्टेशन- यवतमाळ शहर

Source link

mangilal chavhan suicidepolice contable ends lifeyavatmal crime newsyavatmal newsपोलीस हवालदार आत्महत्यायवतमाळ क्राईमयवतमाळ पोलीस आत्महत्या
Comments (0)
Add Comment