MPSCकडून विद्यार्थ्यांना ‘व्हॅंलेटाईन गिफ्ट’, परीक्षा फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ

MPSC: व्हॅलेंटाईन डे हा तरुणांचा उत्साहवर्धक असा दिवस असतो. याच दिवशी अनेक तरुण-तरुणी आपल्या आयुष्याची स्वप्ने रंगवत असतात. एमपीएससी करणाऱ्यांमध्ये तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. याच पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून अचानक परीक्षा फॉर्म भरण्यासाठी तब्बल आठवडाभराची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे एमपीएससीने तरुणांसाठी दिलेलं हे खास गिफ्ट असल्याची समाज माध्यमावर सध्या चर्चा सुरू आहे.

७ फेब्रुवारीपासून तर १४ फेब्रुवारीपर्यंत सध्या देशभरात व्हॅलेंटाईन डे विक मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. आज शेवटचा दिवस म्हणजे व्हॅलेंटाईन डे आणि याच दिवशी आज महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क संयुक्त सेवा परीक्षेसाठी मुदतवाढ जाहीर करण्यात आल्याची सूचना काढण्यात आली.

दिनांक २० जानेवारी रोजी संयुक्त सेवा परीक्षा म्हणजेच कम्बाईनसाठी जाहिरात काढण्यात आली होती. परीक्षा फॉर्म भरण्याची अंतिम तारीख १४ फेब्रुवारी होती. दरम्यान आज अचानक आयोगाने परीक्षा फॉर्म भरण्यासाठी २१ फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ दिली आहे. आज व्हॅलेंटाईन डे असल्यामुळे आयोगाने विद्यार्थ्यांना हे गिफ्ट दिलं असल्याची समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे.

एका व्हायरल मजेशीर पोस्टमध्ये असे म्हटले आहे की ‘अभ्यासू पोरं व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यात बिझी असल्यामुळे आयोगाने मुदतवाढ दिली आहे, तरी सर्वांनी व्हॅलेंटाईन डे साजरा करून झाल्यावर संधीचा लाभ घ्यावा’ अशा प्रकारचे अनेक मिम्स समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. आजच्या दिवशी आयोगाने मुदतवाढ दिल्याने हे गिफ्ट तर नव्हे ना? अशा गप्पा सुरू आहेत.

Source link

mpscMPSC deadline extensionMPSC exam formMPSC JobMPSC VacancyValentine giftएमपीएससीएमपीएससी परीक्षाव्हॅंलेटाईन गिफ्ट
Comments (0)
Add Comment