या एक दिवसीय शिक्षक साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणेच्या भाषा विभागाच्या उपसंचालक तथा जेष्ठ कवयित्री डॉ.कमलादेवी आवटे तर स्वागताध्यक्ष म्हणून कृतिशील शिक्षक महाराष्ट्रचे राज्य सहसंयोजक ज्ञानदेव नवसरे यांची निवड करण्यात आली.
डॉ.आवटे या राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेत भाषा विभागाची जबाबदारी सांभाळत असतांना, राज्याच्या वाडी वस्तीवरील शाळांमध्ये बोलीभाषा, वाचन लेखन विकसनासाठी विविध उपक्रम राबविण्याबरोबरच, महाराष्ट्रातील शिक्षक, विद्यार्थ्यांच्या वाचन, लेखनाला सतत प्रोत्साहन देण्याचे काम करत असतात. त्या स्वतः महाराष्ट्रातील नामवंत कवयित्री व लेखिका आहेत.
‘विद्यार्थी, समाज व शिक्षक हिताय’ हे ब्रीद घेऊन काम करणाऱ्या कृतिशील शिक्षक महाराष्ट्र अर्थात ऍक्टिव्ह टीचर्स महाराष्ट्र (ए.टी.एम) या कृतिशील शिक्षकांच्या समूहाच्या वतीने शिक्षकांच्या प्रगलभीकरणासाठी विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते, त्याचाच एक भाग म्हणून विद्यार्थी व शिक्षकांच्या वाचन आणि लेखनाला प्रोत्साहन, प्रेरणा देण्याच्या हेतूने राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलनाचे आयोजन केले जाते.
महाराष्ट्रातील जास्तीत जास्त शिक्षकांनी या राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलनाचा लाभ घेऊन आपल्या आपल्या साहित्यिक प्रतिभेला अभिव्यक्तीची संधी घ्यावी असे ही पुढे अडसूळ म्हणाले.