मात्र, आता एका डॉक्टरने दावा केला आहे की, तो एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूची नेमकी वेळ सांगू शकतो. ब्रिटीश डॉक्टर Seamus Coyle हे गेल्या अनेक वर्षांपासून कर्करोगाच्या रुग्णांवर संशोधन करत आहे. आता त्यांनी असा शोध लावला आहे ज्यामुळे माणसाच्या मृत्यूची नेमकी वेळ कळण्यास मदत होऊ शकते. डॉक्टरांचा दावा आहे की त्यांनी एक मॉडेल विकसित केले आहे ज्याद्वारे ते कर्करोगाने पीडित रुग्णांच्या मृत्यूची नेमकी वेळ सांगू शकतात.
डॉक्टर सीमस कोयल यांनी त्यांच्या अनेक वर्षांच्या संशोधनानंतर एक मॉडेल विकसित करण्यात यश मिळवले आहे ज्याद्वारे कर्करोगाच्या रुग्णाच्या मृत्यूची नेमकी वेळ सांगता येते. सध्या ते त्यासाठीची चाचणी विकसित करण्याच्या प्रयत्नात आहेत. ज्यामुळे कुटुंबातील सदस्यांना हे समजू शकेल की त्यांच्या प्रियजनांकडे किती वेळ शिल्लक आहे. डॉ. सीमस हे क्लेटरब्रिज कॅन्सर सेंटरमध्ये सल्लागार म्हणून काम करतात. ते लोकांना कॅन्सरला सुरुवातीलाच त्याच्या लक्षणांवरुन कसं ओळखायचं यासाठी मदत करतात.
डॉ. सीमस यांच्या या शोधाने रुग्णांच्या नातेवाइकांना त्यांच्या मृत्यूच्या नेमक्या वेळेची कल्पना आल्यास ते त्यांच्या शेवटच्या क्षणी त्यांच्यासोबत राहू शकतील. कॅन्सरवर दीर्घकाळापासून संशोधन सुरू आहे. मात्र, कॅन्सरग्रस्त रुग्णाचा मृत्यू कधी होईल हे आजपर्यंत कोणीही सांगू शकलेलं नाही. त्यामुळे अनेकदा कुटुंबातील सदस्य शेवटच्या क्षणी रुग्णासोबत नसायचे, असं डॉ. सीमस यांनी सांगितलं.
इंटरनॅशनल जर्नल ऑफ मॉलेक्युलर सायन्सेसमध्ये प्रकाशित झालेल्या त्यांच्या अहवालानुसार रुग्णाच्या लघवीवरून त्याच्या मृत्यूची नेमकी वेळ माहिती करता येईल. हे जाणून घेतल्यानंतर, रुग्ण स्वत: ठरवतील की त्यांना त्यांच्या अखेरच्या क्षणांमध्ये त्यांना त्यांच्या घरी राहायचं आहे की त्यांना रुग्णालयात राहायचे आहे.