वारंवार सांगून कंटाळले, शेवटी आमदारांनीच थेट जेसीबीमध्ये बसून बॅरिकेड हटवून टाकले

तलासरी : भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या हलगर्जीपणामुळे सामान्य व्यक्तींपासून ते मोठ-मोठ्या उद्योजकांना आपला जीव गमावा लागला आहे. याचा संताप व्यक्त करून प्रवाशांचे जीव वाचवण्यासाठी जेसीबीमध्ये बसून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे स्थानिक विधानसभा आमदार कॉम्रेड विनोद निकोले यांनी सिमेंटचे बॅरिकेड हटवून मार्ग खुला करत आंदोलन यशस्वी केले आहे. दरम्यान ‘बॅरिकेड हटवा, माणसं वाचवा’ अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या.

यावेळी आमदार कॉ. निकोले म्हणाले की, ‘मुंबई – अहमदाबाद महामार्गावर महाराष्ट्र – गुजरात सीमेवर पालघर जिल्ह्यातील तलासरी येथील दापचेरी तपासणी नाक्यावर बेकायदेशीरपणे लावलेले सिमेंट बेरिकेड्स त्वरीत हटवा, दापचेरी तपासणी नाक्यावर होणारा आरटीओ चा भ्रष्टाचार त्वरीत बंद झालाच पाहिजे, आरटीओ पासिंग कार्यालय तलासरी स्थानिक विभागातच पाहिजे, स्थानिक वाहन चालकांना पासाची सुविधा मिळालीच पाहिजे, वाहतूक पोलीसांची मनमानी बंद झालीच पाहिजे, कामावरुन कमी केलेल्या कामगारांना त्वरीत कामावर हजर करा, अशा मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.’

पुण्यात खळबळ, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल, भररस्त्यात गैरवर्तन केल्याचा आरोप
या रस्त्यावर छोटी वाहने जाण्यासाठी कोणतीही सोय नव्हती. त्या ठिकाणी अनधिकृतरित्या वळणदार असे सिमेंटचे बेरिकेड्स लावण्याने ७० लोकांचे नाहक बळी गेले आहेत. याबाबत आरटीओ, पोलीस विभागाला आणि स्थानिक प्रशासनाला वारंवार सांगून देखील कोणतीही प्रकारची कार्यवाही होत नव्हती, हे लक्षात घेत आमदार विनोद निकोले यांनी स्वतः जेसीबी मध्ये बसून सिमेंटचे बेरिकेड्स काढून टाकले आहेत.

गळाभेटीने झाले देवाचे दर्शन! गो प्रेमींचा व्हेलेंटाइन्स डे चर्चेत, गायीची गळाभेट घेत साजरा केला दिवस
तसेच चेक पोस्टच्या प्रशासनाबरोबर बैठक घेऊन स्थानिक नागरिक व प्रकल्पग्रस्तांना टोल नाक्यावर नोकरीत घेण्यास व कामावरून कमी केलेल्या कामगारांना पुन्हा कामावर घेण्यास भाग पाडले. त्याचबरोबर स्थानिक रिक्षा चालक, वाहनांचे चालक-मालक यांना नाहक त्रास होणार याची खबरदारी आरटीओ व टोल प्रशासनाने घ्यावी असे आमदार निकोले यांनी सांगितले. शाळकरी बस व रुग्णवाहिका यांना वाहतूक कोंडीतून सुटका मिळावी म्हणून विशेष सोय केली जावी, अशी आमदार निकोले यांनी केलेली मागणी मान्य करण्यात आली.

Valentine’s Day: प्रेमात पडल्यावर आपल्या मनात आणि शरीरात नेमकं काय होतं, प्रेमाची केमिस्ट्री जाणून घ्या
याप्रसंगी आमदार विनोद निकोले, किसान सभा राज्य कार्याध्यक्ष चंद्रकांत गोरखाना, माकप जिल्हा सेक्रेटरी किरण गहला, तालुका सचिव लक्ष्मण डोंभरे, तलासरी उपसभापती नंदू हाडळ, तलासरी नगराध्यक्ष सुरेश भोये, सुरेश जाधव, धनेश अक्रे, विजय वाघात, चालक मालक संघटना रतन भोसले, यश कंपनी युनियन पदाधिकारी सतीश मुल्लासरी आदी शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Source link

BarricadesMla Nikole Removes barricadesmla vinod nikoleआमदार विनोद निकोलेतलासरीदापचेरी तपासणी नाकाबॅरिकेड्स
Comments (0)
Add Comment