आजचे पंचांग आणि दिनविशेष १५ फेब्रुवारी २०२३ : श्रीरामदास नवमी, शुभ मुहूर्त आणि शुभ योग जाणून घेऊया

Authored by Priyanka Wani | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 15 Feb 2023, 7:59 am

बुधवार १५ फेब्रुवारी २०२३, भारतीय सौर २६ माघ शके १९४४, माघ कृष्ण नवमी सकाळी ७-३९ पर्यंत, दशमी उत्तररात्री ५-३२ पर्यंत, चंद्रनक्षत्र: ज्येष्ठात रात्री १२-४५ पर्यंत, चंद्रराशी: वृश्चिक रात्री १२-४५ पर्यंत, सूर्यनक्षत्र: धनिष्ठा ,

 

राष्ट्रीय मिती माघ २६, शक संवत् १९४४, माघ कृष्ण, नवमी, बुधवार, विक्रम संवत् २०७९, सौर माघ मास प्रविष्टे ३, रज्जब-२३, हिजरी १४४४ (मुस्लिम), त्यानुसार इंग्रजी तारीख १५ फेब्रुवारी सन २०२३, सूर्य उत्तरायण, दक्षिण गोल, शिशिर ऋतु.

राहूकाळ दुपारी १२ वाजेपासून ते १ वाजून ३० मिनिटापर्यंत. नवमी तिथी सकाळी ७ वाजून ४० मिनिटापर्यंत त्यानंतर दशमी तिथी प्रारंभ. ज्येष्ठा नक्षत्र अर्धरात्रौ १२ वाजून ४६ मिनिटापर्यंत त्यानंतर मूल नक्षत्र प्रारंभ.

व्याघात योग सकाळी १० वाजेपर्यंत त्यानंतर हर्षण योग प्रारंभ. गर करण सकाळी ७ वाजून ४० मिनिटे त्यानंतर बव करण प्रारंभ. चंद्र अर्धरात्रौ १२ वाजून ४६ मिनिटापर्यंत वृश्चिक राशीत त्यानंतर धनु राशीत प्रवेश करेल.

सूर्योदय:

सकाळी ७-०८,

सूर्यास्त:

सायं. ६-३८,

चंद्रोदय:

उत्तररात्री ३-१८,

चंद्रास्त:

दुपारी १२-२३,

पूर्ण भरती:

पहाटे ५-१९ पाण्याची उंची ३-३२ मीटर, रात्री ८-१७ पाण्याची उंची ३.५२ मीटर,

पूर्ण ओहोटी :

दुपारी १२-३९ पाण्याची उंची १.२२ मीटर, उत्तररात्री १-५६ पाण्याची उंची २.५७ मीटर.

दिनविशेष:

श्रीरामदास नवमी, सज्जनगड यात्रा, गुरू सेवालाल महाराज जयंती.

(दामोदर सोमन)

आजचा शुभ मुहूर्त :

ब्रह्म मुहूर्त सकाळी ५ वाजून १७ मिनिटे ते ६ वाजून ९ मिनिटापर्यंत. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून २७ मिनिटे ते ३ वाजून १२ मिनिटापर्यंत. निशीथ काळ मध्‍यरात्री १२ वाजून ९ मिनिटे ते १ वाजून १ मिनिटापर्यंत. गोधूली बेला सायं ६ वाजून ८ मिनिटे ते ६ वाजून ३४ मिनिटापर्यंत. अमृत काळ दुपारी ४ वाजून २६ मिनिटे ते ५ वाजून ५७ मिनिटापर्यंत राहील.

आजचा अशुभ मुहूर्त :

राहूकाळ दुपारी १२ वाजेपासून ते १ वाजून ३० मिनिटापर्यंत. सकाळी ७ वाजून ३० मिनिटे ते ९ वाजेपर्यंत यमगंड राहील. सकाळी १० वाजून ३० मिनिटे ते १२ वाजेपर्यंत गुलिक काळ राहील. दुर्मुहूर्त काळ दुपारी १२ वाजून १३ मिनिटे ते १२ वाजून ५८ मिनिटापर्यंत राहील. भद्रा काळ सायं ६ वाजून ४१ मिनिटे ते दुसऱ्या दिवशी सकाळी ५ वाजून ३२ मिनिटापर्यंत.

आजचा उपाय :

दुर्गा माताची पूजा करा आणि दुर्गा चालीसाचा पाठ करा.

(आचार्य कृष्णदत्त शर्मा)

Source link

daily astrologypanchang in marathishri ramdas navamishubh muhurta and shubh yogtoday panchang 15 february 2023आजचे पंचांगआजचे पंचांग आणि दिनविशेष २४ डिसेंबर २०२२दिनविशेषशुभ मुहूर्त आणि शुभ योगश्रीरामदास नवमी
Comments (0)
Add Comment