…म्हणून देवेंद्र फडणवीस यांना अटकेची भीती वाटत होती का? ‘सामना’तून रोखठोक सवाल

Thackeray camp slams Devendra Fadnavis | २०१९ मध्ये महाराष्ट्रात सत्तांतराच्या घडामोडी सुरु असताना फोन टॅपिंग प्रकरण चांगलेच गाजले होते. यावरुन महाविकास आघाडी सरकारच्या काळात एसआयटी चौकशी सुरु झाली होती.

 

देवेंद्र फडणवीस

हायलाइट्स:

  • महाराष्ट्रातील फोन टॅपिंग प्रकरण राजस्थानपेक्षा गंभीर आहे
  • वरिष्ठ पोलीस अधिकारीच आमदारांना धमकावत होते
  • देवेंद्र फडणवीस यांच्या बाजूने उभे राहा, असे बजावत होते
मुंबई: अलीकडच्या काळात देवेंद्र फडणवीस हे वारंवार मला महाविकास आघाडीच्या काळात अटक करण्याचा डाव होता, असे सांगत आहेत. फडणवीस हे गेल्या काही दिवसांपासून धादांत खोटे बोलत आहेत. हे संघ संस्कारांस शोभणारे नाही. मुळात देवेंद्र फडणवीस यांना आपल्याला अटक होईल, अशी भीती का वाटत होती? या सगळ्याचा संबंध फोन टॅपिंग प्रकरणाशी आहे का, अशी शंका शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून व्यक्त करण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस हे राज्यातील विरोधी पक्षाचे नेते होते, माजी मुख्यमंत्री होते. १०५ आमदारांचे नेतृत्त्व ते करत होते. अशा नेत्याला अटकेची भीती का वाटत होती? ‘खाई त्याला खवखवे’ किंवा ‘चोराच्या मनात चांदणे’ या दोन म्हणी अशा प्रसंगाला साजेशा आहेत, अशी खोचक टिप्पणी ‘सामना’च्या अग्रलेखातून करण्यात आली आहे.
फोन टॅपिंग प्रकरणातील पोलीस रश्मी शुक्ला यांना महासंचालकपदी बढती
महाराष्ट्रातील फोन टॅपिंग प्रकरण राजस्थानपेक्षा गंभीर आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारीच आमदारांना धमकावून देवेंद्र फडणवीस यांच्या बाजूने उभे राहा, असे बजावत होते. आमदारांचे फोन टॅपिंग करुन हालचालींवर पाळत ठेवली गेली. राजकारणाचा हा गुजरात पॅटर्न महाराष्ट्रात रुजला जाऊ नये, यासाठी महाविकास आघाडी सरकारने कठोर पावले उचलली असतील तर फडणवीस यांनी ते काम पुढे न्यायला हवे होते. खोट्या प्रकरणांमध्ये अडकवून राजकीय विरोधकांना अटक करणे हे महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीत बसत नाही. त्याची सुरुवात भाजपने केली. त्यामुळे चोराच्या मनात चांदणे राहणारच, अशी टीका शिवसेनेकडून (ठाकरे गट) करण्यात आली आहे.
Phone Tapping: रश्मी शुक्ला फडणवीसांच्या सागर बंगल्यावर गेल्या तेव्हाच क्लीन चिट मिळाली: खडसे
फोन टॅपिंग प्रकरणात आरोपीच्या पिंजऱ्यात असलेल्या पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांना पोलीस महासंचालकपदी बढती देण्याच्या मुद्द्यावरही सामनातून भाष्य करण्यात आले आहे. महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांचे फोन टॅप करण्याचे प्रयत्न देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना झाले. या प्रकरणातील वादग्रस्त अधिकारी रश्मी शुक्ला यांची चौकशी करुन त्यांच्यावर पुणे व कुलाबा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. विरोधी पक्षातील नेत्यांच्या नावासमोर दहशतवादी, गुंड टोळ्यांच्या म्होरक्यांची नावे लिहून हे सर्व लोक देशविरोधी कारस्थान रचत असल्याच अहवाल केंद्रीय गृहखात्याकडे पाठवण्यात आला. त्याआधारे संबंधित नेत्यांचे फोन टॅप करण्यासाठी परवानगी मिळवण्यात आली. मुळात याप्रकरणात खोट नव्हती तर मग गुन्हे मागे न घेता राज्य सरकारने तपास सुरु ठेवायला हवा होता. फडणवीसांनी फोन टॅपिंग प्रकरणाचा तपास पुढे न्यायला पाहिजे होता. सरकार तुमचेच होते, त्यामुळे हा तपास निष्पक्षपणे झाला असता. पण हा तपास गुंडाळण्यात आला. ही काय राज्य करण्याची पद्धत झाली का? आणि आता मला अटक करणार होते, असे म्हणत रडायचे हे योग्य नव्हे, असे ‘सामना’च्या अग्रलेखात म्हटले आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Source link

bjpDevendra FadnavisMaharashtra politicsphone tapping caserashmi shukla phone tappingSaamana editorialthackeray camp shivsenaदेवेंद्र फडणवीस रश्मी शुक्ला फोन टॅपिंगफोन टॅपिंग
Comments (0)
Add Comment