भाजप आणि शिंदे गटातील नेत्यांच्या मुलांची लग्नसमारंभात एकमेकांना खुन्नस, तुफान राडा

Authored by विजयसिंह होलम | Edited by रोहित धामणस्कर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 15 Feb 2023, 10:36 am

Ahmednagar local news | कर्डिले यांच्या मुलाने शिंदे गटाच्या शहर जिल्हाध्यक्ष दिलीप सातपुते यांच्या हॉटेलची तोडफोड केली. याप्रकरणी पोलिसांनी ५० ते ६० जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

 

कर्डिले आणि सातपुतेंच्या चिरंजीवांमध्ये राडा

हायलाइट्स:

  • शिंदे गट आणि भाजपच्या कार्यकर्त्यांत राडा
  • किरकोळ कारणातून हॉटेलवर दगडफेक
  • नगरमध्ये तुफान राडा
अहमदनगर : एकीकडे राज्यात एकत्र सत्तेत असलेले आणि लोकसभेतही एकत्र येण्याची चर्चा सुरू असलेले भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) यांच्यात अहमदनगरमध्ये तुफान राडा झाला. एका लग्न समारंभात या दोन पक्षांच्या नेत्यांच्या चिरंजीवांमध्ये वाद झाला. त्याचे पर्यवसन केडगावमध्ये येऊन हॉटेलवर दगडफेक करणे आणि रास्तारोको करण्यामध्ये झाले. या राजकीय राड्यामुळे रात्री काही काळ नगर- पुणे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली.

प्राथमिक माहितीनुसार, नगर तालुक्यातील एक गावात एका नेत्याकडील लग्न समारंभाला राजकीय पुढाऱ्यांनी हजेरी लावली होती. तेथे भाजपचे ज्येष्ठ नेते शिवाजी कर्डिले यांचे पुत्र अक्षय कर्डिले आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे शहर प्रमुख दिलीप सातपुते यांचे चिरंजीव ओंकार सातपुते हेही उपस्थित होते. अहमदनगरधील नेहमीच्या पद्धतीने खुन्नस देण्यावरून त्यांच्यात वाद झाला.
भाजप-राष्ट्रवादीत राडा, शाब्दिक चकमक, एकमेकांच्या अंगावर धावून गेले, खासदार विखे पाटील म्हणाले…
त्यानंतर रात्री कर्डीले गटाच्या समर्थकांनी वाहनांतून नगर शहरातील केडगावामध्ये येत सातपुते यांच्या हॉटेल रंगोलीवर दगडफेक केली. त्यांना सातपुते गटाच्या कार्यकर्त्यांकडूनही प्रतिउत्तर दिल्याने गटाकडून दगडफेक झाली. या प्रकाराच्या निषधार्थ आणि कारवाईच्या मागणीसाठी सातपुते समर्थक म्हणजेच शिंदे गटाचे कार्यकर्ते नगर -पुणे महामार्गावर ठाण मांडून बसले. त्यावरूनही पुन्हा दगडफेक झाली. आधी हॉटेलचे आणि नंतर अन्य वाहनांचे नुकसान झाले. दगडफेकीमुळे हॉटेलच्या बाहेर उभ्या असलेल्या वाहनांच्या काचा फुटल्या. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, पोलीस उपअधीक्षक अनिल कातकाडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके, कोतवालीचे निरीक्षक संपत शिंदे यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखा, नगर तालुका, एमआयडीसी, भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी व अंमलदारांनी घटनास्थळी धाव घेतली.
अध्यक्षपदावरुन वाद, शिंदे-ठाकरे गटात राडा, माजी नगरसेवकाच्या मुलाचा हवेत गोळीबार
पोलिसांनी हस्तक्षेप करून जमावाला शांत केले. तोपर्यंत कर्डिले गटाचे समर्थक निघून गेले होते. सातपुते गटाच्या समर्थकांनी तातडीने गुन्हा दाखल करण्याची मागणी करीत रस्त्यावर बसून राहिले. गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिस ठाण्यात यावे, लागेल असे पोलिस सांगत होते. मात्र, सुरुवातीला कार्यकर्ते ऐकण्याच्या मनस्थिती नव्हते. शेवटी रात्री उशिरा सर्वजण तेथून चालतच पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी आले. त्यानंतर वातावरण निवळले आणि वाहतूक सुरळीत झाली.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Source link

ahmednagar local newsakshay kardile vs onkar satputedilip satputeshinde camp vs bjpshivaji kardileअक्षय कर्डिले ओंकार सातपुते वादअहमदनगरमध्ये नेत्यांच्या मुलांचा राडा
Comments (0)
Add Comment