Xiaomi 13 Pro : १ इंच कॅमेराचा भारतातील पहिला स्मार्टफोन, २६ फेब्रुवारीला लाँचिंग, पाहा डिटेल्स

नवी दिल्लीः Xiaomi 13 Pro Launch in india: Xiaomi ने नुकताच आपला नवीन फ्लॅगशीप Xiaomi 13 Series ला २६ फेब्रुवारीला ग्लोबल मार्केटमध्ये लाँच करणार असल्याची माहिती दिली आहे. शाओमी १३ सीरीज मध्ये कंपनीने Xiaomi 13 आणि Xiaomi 13 Pro स्मार्टफोन लाँच केले आहे. भारतात कंपनी Xiaomi 13 Pro स्मार्टफोनला लाँच करणार आहे. या फोनचे खास वैशिष्ट्ये म्हणजे देशात १ इंच कॅमेरा असलेला हा भारतातील पहिला स्मार्टफोन असणार आहे. भारतात फक्त प्रो मॉडलला लाँच केले जाण्याची शक्यता आहे. भारतात Leica लेंस सोबत शाओमीचा हा पहिला फोन आहे.

Xiaomi 13 Pro features
शाओमी १३ प्रो मध्ये ६.७३ इंचाचा कर्व्ड डिस्प्ले दिला आहे. जो 1440 पिक्सल रिझॉल्यूशन ऑफर करतो. स्क्रीनचा रिफ्रेश रेट 120 हर्ट्ज़ आहे. हा कॉर्निंग गोरिला ग्लास विक्टस प्रोटेक्शन सोबत येतो. फोनचा स्क्रीन-टू-बॉडी रेशियो 86.9 टक्के आहे. स्क्रीन १ हर्ट्ज ते १२० हर्ट्जचे वेरिएबल रिफ्रेश रेट सोबत येतो. डिस्प्ले मध्ये मधोमध पंच होल कॅमेरा दिला आहे. ज्यात ३२ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. Xiaomi 13 Pro मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 Gen 2 प्रोसेसर दिला आहे. या फोनमध्ये 512GB इनबिल्ट स्टोरेज आणि 12GB रॅम दिले आहे.

वाचाः नव्या वर्षात नवीन फ्लॅगशीप फोन लाँच, पाहा कोणता स्मार्टफोन सर्वात जास्त पॉवरफुल

Xiaomi 13 Pro चे बेस मॉडल १२८ जीबी इनबिल्ट स्टोरेज आणि ८ जीबी रॅम सोबत येते. याशिवाय, ८ जीबी रॅम व २५६ जीबी स्टोरेज आणि १२ जीबी रॅम व २५६ जीबी स्टोरेजचे दोन व्हेरियंट या स्मार्टफोनमध्ये मिळते. या फोनमध्ये ५० मेगापिक्सलचा प्रायमरी, ५० मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल आणि ५० मेगापिक्सलचा टेलिफोटो लेन्सचा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. टेलिफोटो लेंस 3.2x ऑप्टिकल झूम सपोर्ट करतो. या फोनमध्ये 120W फास्ट वायर्ड चार्जिंग सोबत 5000mAh ची बॅटरी दिली आहे. हँडसेट मध्ये 50W वायरलेस चार्जिंग आणि 10W रिवर्स वायरलेस चार्जिंग सपोर्ट मिळतो.

वाचाः जिओचा हा प्लान एअरटेलपेक्षा ३६० रुपये स्वस्त, २३ दिवसाची वैधता जास्त आणि हे बेनिफिट्स मिळते, पाहा

Source link

Xiaomi 13 ProXiaomi 13 Pro featuresXiaomi 13 Pro LaunchXiaomi 13 Pro Launch in indiaXiaomi 13 Pro priceXiaomi 13 Series
Comments (0)
Add Comment