करोना लढ्यातून धडा! मुंबई महापालिकेनं केली जबरदस्त कामगिरी

हायलाइट्स:

  • मुंबईत उभी राहिली पहिली जिनोम सिक्वेन्सिंग लॅब
  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाइन उद्घाटन
  • एका वेळी ४०० नमुन्यांची तपासणा करता येणार

मुंबई: करोना संकटाचा सामना करताना आलेल्या अनुभवातून धडा घेऊन मुंबई महापालिकेनं आरोग्य सेवेच्या क्षेत्रात एक मोठी कामगिरी केली आहे. महापालिकेच्या पुढाकारानं सीएसआर फंडाच्या माध्यमातून मुंबईतील नायर रुग्णालयात जिनोम सिक्वेन्सिंग लॅब उभारण्यात आली आहे. या लॅबमध्ये जनुकीय संशोधनावर काम होणार असून एका वेळी ४०० नमुन्यांची तपासणी करणे शक्य होणार आहे. चाचणीचा अहवाल अवघ्या चार तासांत मिळणार आहे. (Genome Sequencing Laboratory at Nair Hospital in Mumbai)

मुंबईतील या पहिल्यावहिल्या जिनोम सिक्वेन्सिंग लॅबचं ऑनलाइन उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज करण्यात आलं. ‘नायर रुग्णालयाचा जन्मच साथरोगाच्या काळात झाला. हे रुग्णालय १०० वर्षे पूर्ण करत आहे. गेल्या शंभर वर्षांपासून हे रुग्णालय आणि येथील डॉक्टर, आरोग्य सेवक रुग्णांना जगवण्याचे काम करत आहेत. आता सुरू करण्यात आलेली ही लॅब नायरच्या शताब्दी वर्षातली सर्वात मोठी आठवण असेल,’ असं मुख्यमंत्री म्हणाले.

वाचा: धर्मभास्कर वाघ याचं नाव घेऊन भाजपचा ठाकरे सरकारवर आरोप; कोण आहे हा माणूस?

‘करोनाची वाढ जिथं जिथं होते, तिथल्या विषाणूला शोधून काढणं, त्याचा जनुकीय परिणाम शोधणं गरजेचं असतं. अन्यथा अनर्थ घडतो. जेवढा विषाणूचा प्रकार ओळखण्यास उशीर, तितका त्याचा परिणाम समजून घेणंही कठीण असतं. करोना विषाणूवरून आपणास हे दिसून आलं आहे. त्यामुळंच नायरमध्ये सुरू झालेली जिनोम सिकवेन्सिंग लॅब ही मोठी कामगिरी आहे. महापालिकेनं इच्छाशक्ती दाखवून हे काम पूर्ण करून दाखवलं. सरकार किंवा महापालिकेच्या तिजोरीवर आर्थिक भार न टाकता सीएसआर फंडातून हे काम केलं,’ याबद्दल मुख्यमंत्र्यांनी महापालिकेचं कौतुक केलं.

‘सध्या करोनासारख्या छुप्या शत्रूशी आपलं युद्ध सुरू आहे. या आणि इतर साथ रोगाच्या विषाणूचे अवतार लवकरात लवकर शोधून वेळेत उपचार करणं गरजेचं आहे. नायरमध्ये सुरू करण्यात आलेल्या लॅबमुळे हे आता शक्य होईल,’ असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

वाचा: ‘राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र येणार यात काहीच शंका नाही’

Source link

BMCGenome Sequencing Lab News UpdateGenome Sequencing Laboratory at Nair HospitalNair Hospital in MumbaiUddhav Thackeray Inaugurates Genome Sequencing Labजिनोम सिक्वेन्सिंग लॅबनायर हॉस्पिटलबीएमसीमुंबई
Comments (0)
Add Comment