कुंभ संक्रांतीची कुंडली हे संकेत देत आहे
सोमवार १३ फेब्रुवारी सकाळी ९ वाजून ४५ मिनिटांनी सूर्याचा कुंभ राशीत प्रवेशादरम्यान कुंभ संक्रांतीच्या कुंडलीत मीन लग्न उदीत होत आहे जिथे लग्न राशीत विराजमान गुरूच्या नुकसान स्थानी म्हणजेच बाराव्या स्थानी सूर्य, शनि, आणि शुक्र यांची युती उत्तर भारतातील हवामानातील बदल आणि राजकीय तापमानात वाढ होण्याचे ज्योतिषशास्त्रीय संकेत देत आहेत. बृहत्संहितेनुसार शुक्राच्या पुढे गुरूचे संक्रमण घशाचे विकार, कफ विकार आणि गारपिटीचे संकेत देते. अशा परिस्थितीत येत्या काही दिवसांत उत्तर आणि मध्य भारतात गारपिटीमुळे उभ्या पिकांचे काही प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे.
सूर्य आणि शनीच्या संयोगामुळे सरकारला अडचणी
कुंभ राशीत सूर्य आणि शनी चा संयोग मंगळ धनिष्ठा नक्षत्रात असल्यामुळे भारतात सुरू असलेले अदानी प्रकरणामुळे केंद्र सरकारला विरोधी पक्षाची टिका सहन करावी लागणार आहे. संक्रांती कुंडलीत सूर्यापासून चौथ्या स्थानी असलेल्या मंगळमुळे देशाच्या राजकारणात अजूनही अशांततेचे वातावरण राहील.
पाकिस्तानात जनआंदोलन आणि आर्थिक आणीबाणीची भीती
शेजारील देश पाकिस्तानमध्ये राजकीय अस्थिरता आणि कोणत्याही मोठ्या जनआंदोलनाचा योगही कुंभसंक्रांतीच्या कुंडलीत दिसून येतो. शुक्र-शनि-राहूच्या विष्णोत्तरी दशेत सुरू असलेल्या पाकिस्तानमध्ये आर्थिक आणीबाणीची शक्यता आहे.
कुंभसंक्रांतीच्या कुंडलीत भूकंपाचे संकेत
२० फेब्रुवारी अमावस्या आणि ७ मार्चच्या पौर्णिमेच्या आसपास भारत आणि पाकिस्तानमध्येही भूकंप होण्याची शक्यता आहे. ६ मार्चला चंद्र मघा नक्षत्रात असताना आणि ७ मार्चला पूर्वा-फाल्गुनीमध्ये अग्नी वर्तुळाच्या प्रभावामुळे आग लागण्याची आणि काही नैसर्गिक आपत्तींची शक्यता निर्माण होत आहे.
(ज्योतिषी सचिन मल्होत्रा)