रविवारी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बबनराव तायवाडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमाला केदार पोहोचले होते. ज्यामध्ये पक्षाचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण, आमदार अभिजीत वंजारी, सुधाकर अडाबळे यांच्यासह पक्षातील अनेक दिग्गज नेते सहभागी झाले होते. यावेळी बोलताना आमदार केदार यांनी अशोक चव्हाण यांच्याबद्दल असे काही बोलले, की सर्वांच्या भुवया उंचावल्या आणि नव्या चर्चेला सुरुवात झाली.
काय म्हणाले सुनील केदार?
केदार म्हणाले, “अशोक चव्हाण मोठ्या मनाचा माणूस आहे. ते आमचा आधारस्तंभ आहेत. आम्ही त्यांना मोठ्या श्रद्धेने पाहत आलो आहोत आणि पाहत राहू. ते कितीही नाही बोलले तरी आम्ही जबरदस्ती करू” केदार यांच्या या वक्तव्यानंतर चर्चेला सुरुवात झाली आहे. लोक आपसात विचारू लागले आहेत की, सुनील केदार चव्हाणांना कोणती नवी जबाबदारी देणार आहेत? पटोलेंच्या जागी चव्हाणांना प्रदेश काँग्रेस अध्यक्ष बनवायचे आहे का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
थोरात यांचे समर्थन केले
बाळासाहेब थोरात यांच्या राजीनाम्यानंतर केदार यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांना पाठिंबा दिला. यासोबतच पटोले यांचेही नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला. केदार म्हणाले होते, “तुम्ही कितीही मोठे झालात, आभाळ गाठलंत, तरी पण थोरातसाहेबांचा आदर जरूर करा.” राज्यात जेव्हापासून महाविकास आघाडीचे सरकार गेले, तेव्हापासून काँग्रेसमधील एका गटाने पटोले यांच्या विरोधात आघाडी उघडली आहे.
चर्चा काही पहिल्यांदाच होत नाहीये
अशोक चव्हाण यांना अध्यक्ष करण्याच्या चर्चेची पहिलीच वेळ नाही. नुकतेच चव्हाणांच्या नाराजीचे वृत्त समोर आले होते, त्यानंतरही पटोले यांच्याऐवजी चव्हाण यांना प्रदेश काँग्रेस अध्यक्ष केले जाऊ शकते, अशी चर्चा जोर धरू लागली. मात्र, भारत जोडो यात्रेनंतर या चर्चांना पूर्णविराम मिळाला. दुसरीकडे, केदार यांनी चव्हाण यांच्याबाबत ज्या पद्धतीने चर्चा केली, त्यामुळे पुन्हा एकदा चर्चेचा बाजार तापला आहे.