Valentine Gift च्या नादात मुंबईतील महिलेची ३.६८ लाखांची फसवणूक, फसवणूक टाळण्यासाठी या टिप्स पाहा

नवी दिल्लीः व्हॅलेंटाइन डे वर अनेक जण आपापल्या पार्नटरला गिफ्ट देत असतात. गिफ्ट देण्यासाठी वेगवेगळ्या आयडिया शोधत असतात. परंतु, मुंबईतील एका महिलेला Valentine Gift चांगलेच महागात पडले आहे. व्हॅलेंटाइन डे गिफ्टच्या नादात या महिलेला तब्बल साडे तीन लाखाचा चुना लागला आहे. जाणून घ्या यासंबंधीची सविस्तर माहिती.

मुंबईत राहणाऱ्या ५१ वर्षीय महिलेची नुकतीच इंस्टाग्रामवरील नवीन मित्राने गिफ्ट पाठवले असल्याची बतावणी केली. या गिफ्टसाठी महिलेला ३.६८ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. रिपोर्टनुसार, महिलेची सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर एक नवीन व्यक्ती Alex Lorenzo शी ओळख झाली होती. त्या व्यक्तीने व्हॅलेंटाइन डे निमित्त महिलेला गिफ्ट पाठवले असे सांगितले. यानंतर महिलेला पार्सलच्या बदल्यात ७५० यूरो म्हणजेच जवळपास ६६ हजार ५९१ रुपये जमा करण्यास सांगितले.

मनी लाँड्रिंगमध्ये फसवण्याची मिळाली धमकी
यानंतर महिलेला कूरियर कंपनीकडून मेसेज मिळाला की, पार्सल लिमिट जास्त आहे. त्यामुळे महिलेला ७२ हजार रुपये अतिरिक्त द्यावे लागतील. पेमेंट केल्यानंतर पुन्हा महिलेला कूरियर कंपनीकडून फोन आला. पार्सलमध्ये यूरोपियन करन्सीचे नोट मिळाले आहेत. यामुळे मनी लाँड्रिंग अंतर्गत कारवाई केली जावू शकते. यातून वाचण्यासाठी २ लाख ६५ हजार रुपये जमा करावे लागतील.

वाचाः Xiaomi 13 Pro : १ इंच कॅमेराचा भारतातील पहिला स्मार्टफोन, २६ फेब्रुवारीला लाँचिंग, पाहा डिटेल्स

पैसे देण्यास नका देताच स्कॅम उघड
महिलेनी पेमेंट केले. हे प्रकरण इथेच थांबले नाही. महिलेकडे पुन्हा ९८ हजार रुपयाची मागणी करण्यात आली. यावेळी महिलेला थोडा संशय आला. तिने पैस देण्यास नकार दिला. नंतर Alex Lorenzo कडून धमकी मिळायला सुरुवात झाली. फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले जाईल. तसेच मित्राला आणि कुटुंबाला हे फोटो पाठवले जातील. यानंतर महिलेने थेट पोलीस ठाणे गाठून याविरोधात तक्रार दाखल केली. परंतु, महिले सोबत ३.६८ लाख रुपयाचा स्कॅम झाला.

वाचाः नव्या वर्षात नवीन फ्लॅगशीप फोन लाँच, पाहा कोणता स्मार्टफोन सर्वात जास्त पॉवरफुल

या टिप्स फॉलो करा

  • कोणीही पार्सल पाठवल्यास त्यासाठी पैसे देवू नका
  • अनोळखी व्यक्तीवर लगेच विश्वास ठेवू नका
  • आर्थिक फसवणूक होत असल्याचा संशय आल्यास
  • थेट पोलिस ठाणे गाठून रितसर तक्रार दाखल करा
  • सोशल मीडियावर आंधळेपणाने विश्वास ठेवू नका
  • कस्टम अधिकारी सांगून कुणी पैसे मागितल्यास देवू नका
  • आपल्या मोबाइलवर आलेला ओटीपी कधीच कुणाला सांगू नका

वाचाः फोटोग्राफीसाठी या ३ मोबाइल लेन्सचा धरा आग्रह, DSLR कॅमेराही यापुढे पडेल फिका

Source link

Valentine giftValentine Gift fraud in mumbaivalentine giftsvalentines day gift fraudvalentines gift fraud
Comments (0)
Add Comment