मान्सूनवर हंगामी प्रभाव असल्याने अल निनोचा धोका असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे सरासरीपेक्षा यंदा खूपच कमी पाऊस होईल. यामुळे देशाला दुष्काळाचा सामना करावा लागू शकतो. इतकंच नाहीतर अतिवृष्टीमुळे पिकांवरही याचा वाईट परिणाम पाहायला मिळेल. कमी उत्पन्नामुळे महागाई वाढेल असा यंदाच्या मान्सूनचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
पॅसिफिक महासागरातील महासागराचा पृष्ठभाग गरम झाल्यावर अल नीनो होतो. याचा परिणाम नैऋत्य मान्सूनवर पाहायला मिळतो. नॅशनल ओशियानिक अँड अॅटमॉस्फरिक ऍडमिनिस्ट्रेशनने हा अंदाज वर्तवला आहे. मे-जूनच्या दरम्यान अल निनोचा प्रभाव पाहायला मिळेल. या कालावधीमध्ये ऊन आणि पावसाळा असे दोन्हीही ऋतू एकत्र असतील. तर मान्सून जून ते सप्टेंबरपर्यंत सक्रिय राहील अशी माहिती समोर आली आहे.
मेरीलँड विद्यापीठाचे प्रोफेसर आणि शास्त्रज्ञ रघु मुरातुगूड्डे यांनी दिलेल्या माहितीनुसार, हंगामी प्रभाव ला निनो असतो. तेव्हा उष्णकटिबंधीय प्रशांत महासागर उष्णता शोषून घेतो आणि याच्यामुळे पाण्याचे तापमान वाढतं. अल निनोच्या प्रभावादरम्यान पाणी पश्चिम पॅसिफिकमधून पूर्व पॅसिफिककडे वाहतं. अल निनोच्या सलग ३ कालावधीचा अर्थ असा होतो की कोमट पाण्याचे प्रमाण हे शिखरावर आहे. अशा परिस्थितीमध्ये अल निनोचा प्रभाव पुन्हा येण्याची शक्यता असते. यामुळे वसंत ऋतूपासून देशामध्ये याचा प्रभाव पाहायला मिळू शकतो.
अल निनोमुळे दुष्काळ ओढवण्याची भीती आहे. या प्रभावामुळे पाऊसही कमी पडतो. परंतु १९९७ मध्ये प्रभाव मोठ्या प्रमाणात झाला होता, तरी देखील सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला. २००४ मध्ये तो कमकुवत असूनही तीव्र दुष्काळ पडला. हवामान विभागाचे प्रमुख जीपी शर्मा यांनी यावर म्हटले की, ९ महिन्यासाठी अल निनोचा अंदाज आहे. यामुळे यंदाच्या वर्षामध्ये देशात दुष्काळ पडण्याची शक्यता ६० टक्के आहे. या कालावधीमध्ये सर्वात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता ३० टक्के असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.