या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, गोंदियातील सूर्यटोला परिसरात देवानंद मेश्राम (५२) त्यांची मुलगी आरती के. शेंडे (३०) आणि त्यांचा चार वर्षांचा नातू जय बुधवारी रात्री झोपले होते. दरम्यान, मेश्राम यांचा जावई किशोर शेंडे (३५) हा दुपारी १२.३० च्या सुमारास सासरच्या घरी पोहोचला. पळून जाण्यापूर्वी त्याने शांतपणे घराभोवती पेट्रोल टाकले आणि घरच पेटवून दिले.
पोलिसांनी केली आरोपीला अटक
गोंदियाचे एसडीपीओ सुनील ताजणे यांनी या प्रकरणाबाबत माहिती देताना सांगितले की, मेश्राम या आगीत गंभीररित्या भाजले आणि त्यांचा गुदमरून मृत्यू झाला, तर त्यांची मुलगी आरती आणि तिचा मुलगा जय या घटनेत गंभीर भाजले. ताजणे यांनी पुढे सांगितले की, आरोपी किशोर शेंडे हा घटनेनंतर फरार होता, मात्र आता आम्ही त्याला पकडण्यात आले असून तो पोलिसांच्या ताब्यात आहे.
भांडणामुळे किशोर पत्नी आणि मुलापासून वेगळा राहत असे
एसडीपीओ म्हणाले की, आम्ही अपघाती मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास करत आहोत. आरोपी शेंडे हा पत्नी आरती आणि मुलगा जय यांच्यापासून सततची भांडणे आणि शारीरिक मारहाणी अशा प्रकारामुळे पती-पत्नी वेगळे राहत होते, अशी माहिती स्थानिकांनी दिली.
दोघांची प्रकृती गंभीर आहे
गेल्यावर्षी कंटाळून आरतीने आपल्या मुलासह शेंडे यांचे घर सोडले आणि ती वडिलांच्या घरी राहायला गेली आणि तेव्हापासून ती तिथेच राहते. ताजणे म्हणाले की, पीडित महिला आणि तिचा मुलगा सुमारे ८० टक्के भाजल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक असून स्थानिक रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर त्यांला नागपूरच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे.