अग्निशमन दलाचे जवान आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत होते. अद्याप आग विझलेली नसून या आगीमध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. कंपनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, तसेच आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
या आगीने आजूबाजूच्या कंपन्यांमधील नागरिकांची धावपळ उडालेली पाहायला मिळाली. नागरिकांनी तातडीने अग्नीशमन दलाला ही बाब कळवताच अग्नीशमन दलाने देखील तातडीने धाव घेतली होती. आगीची तीव्रता पाहता तब्बल १० पेक्षा जास्त गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. अखेर सायंकाळी उशिरा पर्यंत ही आग विझवण्याचा प्रयत्न अग्नीशमन दलाचे जवान करत होते.
तुर्भे हे नवी मुंबईच्या मध्यभागी असल्याने आणि आगीची तीव्रता पाहता ऐरोली ते बेलापूरपासून काळा धूर दिसत होता, एवढी प्रचंड आग कंपनीला लागली होती. आगीच्या लोटांमुळे आजूबाजूच्या परिसरामध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. कंपनीतील कर्मचारी कामगारांची धावपळ उडाली असून प्रत्येक व्यक्ती स्वतःचा जीव वाचविण्याच्या उद्देशाने सैरभैरा पळत होते. तुर्भे विभागामध्ये आगीच्या घटना या वारंवार होत आहेत. सायंकाळी पाचच्या सुमारास लागलेल्या या आगीला विझविण्यासाठी जवानांचे प्रयत्न चालू होते.
आग इतकी भयानक लागली होती, की आटोक्यात आणण्यास अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्यावर सर्वोतोपरी प्रयत्न चालू होते. आग नक्की कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नसून नायलॉन कापड कंपनी पूर्णपणे जाळून खाक झाली आहे. कंपनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून कंपनीतील कामगार सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले आहे. आग विझवण्याचा प्रयत्न चालू असून आग आटोक्यात आणण्यासाठी काही वेळ लागणार आहे.