Chinchwad Bypoll in Pune | गेल्या काही दिवसांपासून कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वेगवान राजकीय घडामोडी पाहायला मिळत आहेत. अशातच भाजपला चिंचवडमध्ये एक मोठा धक्का बसला आहे.
हायलाइट्स:
- माजी नगरसेवक तुषार कामठे यांचा तडकाफडकी राजीनामा
- चिंचवडमध्ये भाजपला खिंडार
तुषार कामठे हे अगोदर राष्ट्रवादीमध्ये असताना त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. चिंचवड मतदार संघातील पिंपळे निलखमधून ते २०१७ ला निवडून आले होते. तेव्हापासून ते महानगरपालिकेतील विविध भ्रष्टाचार बाहेर काढण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. मात्र, त्यांच्या या कामाची पक्षाने दखल न घेतल्याने त्यांनी नगरसेवकपदाचा काही दिवसांचा कार्यकाळ शिल्लक असताना राजीनामा दिला होता. यानंतर आता चिंचवड निवडणुकीसाठी भाजपचा प्रचार जोमात सुरु असताना त्यांनी पक्ष सदस्यत्त्वाचाही राजीनामा दिला आहे. त्यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि शहराध्यक्ष महेश लांडगे यांना राजीनाम्याचे पत्र पाठवले आहे. भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप यांचा प्रचार जोरात सुरू झाला असताना ते पक्षातून बाहेर पडले आहेत. त्यामुळे राजकीय चर्चांना चांगलेच उधाण आले आहे. त्यांनी राजीनामा दिल्याने भाजपला याचा किती फटका बसणार हे निवडणूक निकालावेळी दिसणार आहे. त्यांचा राजीनामा हा भाजपसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे.
तुषार कामठे यांनी २४ फेब्रुवारीला २०२२ला नगरसेवक पदाचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून ते भाजपमध्ये काम करत होते. योग्य संधीची वाट पहात होते.भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे अश्विनी जगताप यांच्या प्रचारसाठी मतदार संघात येणार आहेत. त्यामुळे कामठे यांचा राजीनामा भाजप मंजूर करणार का? त्यांनी राजीनामा का दिला याचे कारण अद्याप समोर आले नसले तरी, त्यांच्या कामाची पक्षात दखल घेतली जात नव्हती आणि त्यांना कोणतेही पद देण्यात आले नव्हते, त्यामुळे त्यांनी राजीनामा दिल्याचे चर्चा आता जोर धरू लागल्या आहेत.
चिंचवड पोटनिवडणुकीत तिरंगी लढत
चिंचवड पोटनिवडणुकीत अश्विनी जगताप यांच्या प्रचारासाठी भाजपचे प्रमुख नेते मैदानात उतरले आहेत. चिंचवडमध्ये भाजपने सभा, गाठीभेटी आणि कॉर्नर सभांचा धडाका लावला आहे. चिंचवड पोटनिवडणुकीत भाजपच्या अश्विनी जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना काटे आणि अपक्ष म्हणून रिंगणात उतरलेले राहुल कलाटे अशी तिरंगी लढत रंगणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील चिंचवड पोटनिवडणुकीच्या प्रचारात उतरले आहेत. त्यांनी बुधवारी अश्विनी जगताप यांची भेट घेतली होती.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.