इन्स्टाग्रामवरील मैत्रीनं घात झाला, १५ वर्षाच्या मुलानं अल्पवयीन मुलीसोबत नको ते केलं

संतोष शिराळे, सातारा : धावपळीच्या जगात सोशल मीडियाने इतका धुमाकूळ घालून ठेवला आहे की इकडे तिकडे बघण्यासाठी सुद्धा वेळ मिळत नाही. इंस्टाग्राम, स्नॅपचॅट, फेसबुक हे लहानांपासून थोरांपर्यंत व्यक्त होण्याचे माध्यम झाले आहे. त्याचा वापर शाळकरी मुलांमध्येसुद्धा मोठ्या प्रमाणात केला जातो. त्याचा दुष्परिणाम इतका घातक होत आहे, की याचे सामाजिक भानच राहत नाही. लॉकडाऊननंतर अभ्यासासाठी मुलांच्या हातात आलेला मोबाईल हाच त्यांच्या पुढील शैक्षणिक, सामाजिक कारकिर्दीला घातक ठरू पाहत आहे, अशीच एक घटना सातारा जिल्ह्यात घडली आहे. त्यामुळे सामाजिक भान विसरलो काय, हा प्रश्न आहे.

जिल्ह्यातील एका अल्पवयीन शाळकरी मुलाने अल्पवयीनच मुलीवर अत्याचार केला. यामध्ये मुलगी चार महिन्यांची गर्भवती राहिली आहे. याप्रकरणी शाहुपुरी पोलीस ठाण्यात मुलावर पोक्सोचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, संबंधित मुलगा जिल्ह्यातील एका गावचा रहिवासी आहे. त्याचे वय १५ असून तो शिक्षण घेत आहे. तर मुलगी ही साडेतेरा वर्षांची आहे. तीही जिल्ह्यातील रहिवासी आहे.

संबंधित मुलाने गोड बोलून मुलीवर अत्याचार केले. यामध्ये अल्पवयीन मुलगी चार महिन्यांची गर्भवती राहिली आहे. यानंतर मुलीच्या नातेवाइकांकडून मुलाच्या विरोधात शाहुपुरी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंद केलेला आहे. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक मुल्ला हे तपास करीत आहेत.

चिंचवड पोटनिवडणुकीचा प्रचार ऐन भरात असतानाच भाजपला धक्का, माजी नगरसेवक तुषार कामठे यांचा तडकाफडकी राजीनामा

समाजमाध्यमांच्या वापराबाबत गांभीर्यानं विचार करण्याची गरज

अल्पवयीन मुलीवर झालेला अत्याचार हा खूपच धक्कादायक आहे. अगदी अंतर्मनाला पूर्णपणे हादरवून टाकणारी अशीच घटना आहे. या घटनेची पार्श्वभूमीबद्दल जी माहिती ऐकली की सोशल मीडियावर झालेल्या ओळखीतून जी मैत्री झाली त्यातून हा निंदनीय प्रकार घडला आहे. खरे तर एवढ्या लहान वयात अशाप्रकारे विकसित झालेल्या नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर ज्यांना त्याचा खरा अर्थ माहित नाही त्यांचे हाती ही साधने पडली की ती घातक शस्त्रे बनतात आणि मग अशा दुर्दैवी प्रकार घडतात.यामुळे अशा घटना नुसत्या ऐकून समाजाने दुर्लक्ष करण्यापेक्षा यावर गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे, असं सातारा येथील सामाजिक कार्यकर्ते भारत भोसले यांनी सांगितलं.

मुंबईतील प्रसिद्ध ‘मुच्छड पानवाला’च्या दुकानात मुंबई पोलिसांची धाड; सापडलं मोठं घबाड

आपली मुले काय करतात,कोणाशी संगत करतात, मोबाईलचा वापर नेमका कशासाठी करीत आहेत यावर लक्ष ठेवणे ही आपल्या प्रत्येकाची नैतिक जबाबदारी असून आपण ती स्वीकारलीच पाहिजे. अन्यथा, येणारा काळ आपल्याला माफ करणार नाही. पालकांनो, सद्यस्थितीत तुम्ही अब्जाधीश होऊ शकता परंतु, यशस्वी पालक व्हाल याची खात्री नाही.तेव्हा येणाऱ्या भविष्य काळात निकोप समाज निर्मितीसाठी आपण प्रत्येकाने आपल्या मुलांच्या भवितव्याप्रती फार जागरूक राहणे आवश्यक आहे.आपली मुले शिकलीच पाहिजेत परंतु, एकवेळ कमी शिकली तरी चालतील पण संस्काराने घडली पाहिजेत याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचं भारत भोसले म्हणाले.

jitendra awhad: राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी महेश आहेरांना चोपलं, जितेंद्र आव्हाडांसह ७ जणांवर गुन्हा दाखल

Source link

instagram newsMarathi Breaking Newsminor girl pregnantSatara CrimeSatara Crime Newssatara latest newssatara news todaySatara policeसातारा पोलीससातारा बातम्या
Comments (0)
Add Comment