Nilesh Rane Criticizes Shiv Sena: ‘शिवसैनिकांचं ‘हे’ काय चाललंय?’; नीलेश राणेंचा शिवसेनेवर प्रहार

हायलाइट्स:

  • माजी खासदार आणि भाजप नेते नीलेश राणे यांनी शिवसेनेवर पुन्हा एकदा टीका.
  • एका व्यापाऱ्याच्या फोनचा हवाला देत शिवसैनिक चिपळूनमध्ये पुरासाठी वर्गणी गोळा करत असल्याचा राणेंचा आरोप.
  • नितेश राणेंनीही केली शिवसेनेवर टीका.

मुंबई: माजी खासदार आणि भाजप नेते नीलेश राणे यांनी शिवसेनेवर पुन्हा एकदा टीकेचे प्रहार केले आहेत. एका व्यापाऱ्याच्या फोनचा हवाला देत शिवसैनिक चिपळूनमध्ये पुरासाठी वर्गणी गोळा करत असल्याचा आरोप नीलेश राणे यांनी केला आहे. ही वर्गणी व्यापाऱ्यांकडून वसूल करणे सुरू असल्याचे सांगत ‘हे काय चालले आहे?’, असा सवाल नीलेश राणे यांनी विचारला आहे. (former mp nilesh rane criticizes shiv sena)

नीलेश राणे यांनी ट्विट करत शिवसेनेवर हा आरोप केला आहे. ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, ‘मुंबईतल्या एका मराठी व्यापाऱ्याचा फोन आला. त्याने विचारले चिपळूणला जो पूर आला त्यासाठी शिवसैनिकांना काही वेगळी वर्गणी जमा करायला सांगितली आहे का? कारण प्रत्येक दुकानात जाऊन आम्हाला चिपळूनला मदत करायची आहे असे सांगून व्यापाऱ्यांकडून वर्गणी जमा करण्याचं काम मुंबईत सुरू आहे. काय चाललंय?’

मदतीच्या चेकवरूनही साधला ठाकरे सरकारवर निशाणा

नीलेश राणे यांनी आणखी एका ट्विटमध्ये दरडग्रस्तांना वाटप करण्यात आलेले धनादेश परत घेतल्याच्या मुद्द्यावरून ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, ‘गिव्ह अँड टेक‘ चा अर्थ एका हाताने घ्या आणि दुसऱ्या हाताने द्या. ठाकरे सरकारचा ‘गिव्ह अँड टेक‘ म्हणजे एक दिवस द्या आणि दुसऱ्या दिवशी तेच परत घ्या. दरडग्रस्तांची क्रूर चेष्टा केली आहे ठाकरे सरकारने. ठाकरे सरकारने नीचपणा जगात शिल्लक ठेवला नाही, सगळा वापरला.

आमदार नितेश राणेंचीही सरकारवर टीका

आमदार नितेश राणे यांनीही गणेश मंडळांच्या आर्थिक उत्पन्नाचा मुद्दा उपस्थित करत ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. नितेश राणे यांनी ट्विट करत नितेश यांनी ही टीका केली आहे. ते ट्विटमध्ये म्हणतात, ‘गणेश मंडळे आर्थिक संकटात असताना स्वागत कमानी त्यांच्या उत्पनाचे साधन आहे. स्वागत कमानी मुळे कोरोना पसरतो असे कुठल्या मुन्ना भाई MBBS नी या ठाकरे सरकारला सांगितले आहे? १०० कोटींची वसुली करून स्वतःचे खिसे भरता, मग या मंडळांनी काय करावे ?मग यांच्या वाढदिवसाचे फलक कसे लागतात?’

Source link

former mp nilesh ranenilesh rane criticizes shiv senaNitesh Raneनितेश राणेनीलेश राणेशिवसेना
Comments (0)
Add Comment