दहावी, बारावीच्या लाखो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; निर्धारीत वेळेनंतर मिळणार अधिकचा कालावधी

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दहावी, बारावी परीक्षेत विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिका लिहण्यासाठी निर्धारीत वेळेनंतर दहा मिनीटांचा अधिकचा कालावधी मिळणार आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बुधवारी निर्णय घेतला. त्यामुळे राज्यातील दहावी, बारावीच्या ३५ लाख विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. पेपरफुटी, गैरप्रकारांमुळे यंदापासून १० मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका देण्याचा निर्णय शिक्षण मंडळाने रद्द केला होता. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.

शिक्षण मंडळाकडून विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका निर्धारीत वेळेच्या दहा मिनीटे अगोदर केल्या जात होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना निर्धारीत वेळेपूर्वी प्रश्न समजण्यास मदत होत असे. परंतु अनेकदा प्रश्नपत्रिका सोशल मीडियावरुन व्हायरल झाल्याच्या घटनाही समोर आल्या. अशा घटनांचा विचार करत यंदापासून नियमात बदल करण्याचा मंडळाने निर्णय घेतला.

फेब्रुवारी-मार्च २०२३ परीक्षेत निर्धारीत वेळेपूर्वी दहा मिनिटे अगोदर मिळणारी प्रश्नपत्रिकेची सुविधा रद्द करण्यात आली. त्यानंतर बुधवारी निर्धारीत वेळेनंतर दहा मिनीटांचा अधिकचा वेळ वाढवून देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिका लिहण्यास अधिकचा वेळ मिळणार असल्याचे सांगण्यात येते. निर्णयाने राज्यातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांसह, विद्यार्थी, पालकांमधून उत्तरपत्रिका दहा मिनिट उशिरा घेण्यात यावी अशी मागणी पुढे आली होती. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येते. दहावी, बारावीतील विद्यार्थी हत लक्षात घेवून व पालक, विद्यार्थी यांच्या मागणीचा विचार करून दहा मिनिटे परीक्षेच्या निर्धारीत वेळेनंतर वाढवून देण्यात येत आहे, असे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने स्पष्ट केले.

परीक्षेची सुधारीत वेळ
सकाळ सत्र- ११ ते २.१०
सकाळी सत्र- ११ ते १.१०
सकाळी सत्र- ११ ते १.४०

दुपारचे सत्र- ३ ते ६.१०
दुपारचे सत्र- ३ ते ५.१०
दुपारचे सत्र- ३ ते ५.४०

Source link

10th 12th studentsbig relief for studentsclass 10th 12thदहावी-बारावी परीक्षामाध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळविद्यार्थ्यांना दिलासा
Comments (0)
Add Comment