मुंबई विद्यापीठाच्या कर्मवीर भाऊराव पाटील वसतिगृहामध्ये एकूण ८० जागा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत. यामध्ये पदव्युत्तर विद्यार्थ्यांना राहण्यासाठी जागा मिळणे अपेक्षित असताना या वसतिगृहामध्ये कायद्याच्या पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना राहायला जागा दिल्याने पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत.
मुलांसाठी केवळ एक वसतिगृह असताना हे वसतिगृह विद्यापीठातील पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्यांसाठी उपलब्ध होणे अपेक्षित होते, असे मत पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी मांडले आहे. एलएलबीच्या पाचहून अधिक विद्यार्थ्यांना कर्मवीर भाऊराव पाटील वसतिगृहामध्ये राहण्यासाठी जागा देण्यात आली आहे. विद्यापीठाच्या नियमांनुसार वसतिगृहामध्ये एलएलबीच्या विद्यार्थ्यांना राहण्यासाठी जागा नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांना कोणत्या कारणांमुळे प्राधान्य देण्यात आले, असा प्रश्न वसतिगृहातील इतर पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे.
काही विभागाच्या जागा शिल्लक राहिल्या तर त्या विभागाची परवानगी घेऊन त्या जागा इतर विभागाच्या विद्यार्थ्यांना देण्याची तरतूद आहे. ही तरतूद पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीच का वापरली गेली नाही, असाही प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या काही विद्यार्थ्यांना चर्चगेट येथील वसतिगृहामध्ये राहावे लागत आहे. या विद्यार्थ्यांना कलिनापर्यंतचा प्रवास करावा लागतो. कलिनाच्या विद्यापीठातच त्यांना राहण्यासाठी जागा मिळाली असतील तर प्रवासाचा खर्च आणि वेळ वाचला असता.
एलएलबीचा अभ्यासक्रम हा पाच वर्षांचा असून या वर्षी एलएलबीच्या ज्या विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश देण्यात आला आहे, त्या विद्यार्थ्यांना पुढच्या वर्षीही वसतिगृहात जागा द्यावी लागेल. त्यामुळे सलग पाच वर्षे पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या वसतिगृहातील राहण्याच्या जागांचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच एकदा पदवीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला की पुढील वर्षी ही प्रथा सुरू होईल, अशीही भीती व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर पदवीच्या विद्यार्थ्यांसाठी नियोजित जागा देऊन वसतिगृहात जागा शिल्लक राहिल्यास त्या जागा पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळण्याची अपेक्षा तक्रारदार विद्यार्थ्यांनी नाव न जाहीर करण्याच्या अटीवर व्यक्त केली आहे.
विद्यार्थ्यांकडून तक्रार नाही!
जागा उपलब्ध न होण्याबद्दल पदव्युत्तर विद्यार्थ्यांकडून कोणतीही तक्रार आलेली नाही असे वसतिगृह अधीक्षक संतोष गीते यांनी सांगितले. कायद्याच्या विद्यार्थ्यांना चर्चगेट येथे जागा आहेत. मात्र युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई लॉ अकेडमी अवघ्या काही वर्षांपूर्वी सुरू झाली. हा अभ्यासक्रम १२वी नंतरचा आहे. त्यांना राहण्यासाठी जागा नाही, ही समस्या आहे. वसतिगृहात काही जागा असल्या तर एका खोलीत दोघे किंवा अशा पद्धतीने वरून आलेल्या निर्देशानुसार त्यांनाही त्या वर्षापुरती जागा देतो, असे गीते यांनी स्पष्ट केले. मात्र अशी परिस्थिती असेल तरी आत्तापर्यंत कोणत्याही पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश दिलेला नाही, अशी घटना घडलेली नाही. ५६ विभागांमधून आलेल्या कोणत्याही विद्यार्थ्याला जागेसाठी नाही म्हटलेले नाही, असेही ते म्हणाले.