डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ समितीकडून ३५ कॉलेजांचा आढावा

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्नित ३५ महाविद्यालयांनी मागील काही वर्षांत इतर विद्यापीठाचे संलग्नीकरण स्वीकारल्याचे सांगण्यात येते. विद्यापीठाकडे ३५ महाविद्यालयांचे अभिलेखे उपलब्ध नसल्याने विद्यापीठाने समिती नेमली. समितीने तपासणी पूर्ण केल्याचे सूत्रांनी सांगितले.

विद्यापीठाशी संलग्नित ४८६ महाविद्यालयांपैकी ३५ महाविद्यालयांचे विद्यापीठाकडे अभिलेख उपलब्ध नव्हते. मागील तीन, चार वर्षात महाविद्यालयांनी विद्यापीठाशी संपर्कही केलेला नाही. विद्यापीठाच्या यादीत नावे आहेत. कक्षेबाहेर असलेल्या आणि अभिलेख उपलब्ध नसलेली ही महाविद्यालये बंद आहेत का सुरू आहेत, याबाबत आढावा घेण्यासाठी विद्यापीठाने अधिष्ठाता डॉ. भालचंद्र वायकर यांच्या अध्यक्षतेखाली तीन जणांची समिती नेमली.

तीन दिवसांत तातडीने अहवाल देण्याचे निर्देश कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी समितीला दिले होते. मात्र, विद्यापीठाच्या संपर्काबाहेर असलेल्या या ३५ महाविद्यालयांची माहिती गोळा करण्यास वेळ लागत असल्यामुळे विद्यापीठाने महाविद्यालयांची माहिती घेण्यासाठी नेमलेल्या समितीला आठवडाभराची मुदतवाढ दिली होती. या महाविद्यालयांच्या संलग्नीकरणाचे कोणतेही रेकार्ड विद्यापीठ प्रशासनाकडे उपलब्ध नाही. त्यामुळे या महाविद्यालयांचा ‘कारभार’ शोधण्यासाठी प्रशासनासह समितीचीही धांदल उडाली.

शुल्क समितीबाबत सरकारची अनास्था
करोना कालावधीत महाविद्यालये बंद पडली आहेत का, ही महाविद्यालये इतर विद्यापीठासोबत संलग्नित झाली आहेत का याची माहिती समितीने घेतली. समितीने आता याचा आढावा पूर्ण केला असून, अहवाल प्रशासनाला एक ते दोन दिवसांत सादर करणार असल्याचे कळते. तपासातून बहुतांशी महाविद्यालयांनी इतर विद्यापीठाचे संलग्नीकरण स्वीकारले असल्याचे कळते. अशा महाविद्यालयांची यादी आणि त्यांचे पत्रासह अहवालात कारणे नमूद केलेले असतील, असे सूत्रांनी सांगितले.

यादीतून वगळणार

आता आढाव्यानंतर निश्चित संलग्नीकरण महाविद्यालयांची यादी एप्रिलपर्यंत पूर्ण केली जाईल, असे प्रशासकीय अधिकारी सूत्रांनी सांगितले. येत्या शैक्षणिक वर्षात महाविद्यालये, प्रवेश क्षमता याबाबत स्पष्टता यावी यासाठी विद्यापीठाच्या प्रशासकीय पातळीवरून प्रयत्न सुरू असल्याचेही सांगण्यात येते.

पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना २० टक्‍के अभ्यासक्रम ऑनलाइन
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सत्र परीक्षा रखडल्या, यंदाचे शैक्षणिक वर्ष रेंगाळण्याची भीती

Source link

collegesCommittee ReviewDr Babasaheb Ambedkar CollegeMaharashtra TimesMarathwada University Collegeकॉलेजांचा आढावाडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठमराठवाडा विद्यापीठ समिती
Comments (0)
Add Comment