एनपीसीआयएलमध्ये लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट, स्टायपेंडरी ट्रेनी यासह अनेक पदे भरण्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट npcil.co.in द्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. यासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया ८ फेब्रुवारी २०२३ पासून सुरू झाली आहे. उमेदवारांची निवड लेखी चाचणी आणि त्यानंतर कौशल्य चाचणीद्वारे केली जाणार आहे.
एनपीसीआयएलच्या तारापूर साइटसाठी १९३ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. याअंतर्गत नर्स-ए, लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट, स्टायपेंडरी ट्रेनी, डेंटल टेक्निशियन, एक्स-रे टेक्निशियन, प्लांट ऑपरेटर ही पदे भरली जातील. या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त संस्था किंवा विद्यापीठातून किमान ५० टक्के गुणांसह सायन्स स्ट्रिममध्ये(भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित विषयांसह) इयत्ता बारावी किंवा इंटरमिजिएट उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय किमान १८ वर्षे आणि कमाल ३५ वर्षे असावे. तसेच, सरकारच्या नियमांनुसार SC/ST/OBC/PWD/PH मधील उमेदवारांना वयात सवलत दिली जाणार आहे. ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी, उमेदवाराला अनिवार्य अर्ज शुल्क भरावे लागेल. अर्जाची फी फक्त ऑनलाइन पद्धतीने भरायची आहे, इतर कोणत्याही पद्धतीने फी स्वीकारली जाणार नाही. Gen/OBC/EWS उमेदवारांना पाचशे रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. तर SC/ST/PWD/महिला उमेदवारांना कोणतेही अर्ज शुल्क भरावे लागत नाही.
न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन इंडिया लिमिटेड (NPCIL) ने ऑनलाइन नोंदणी प्रक्रियेसाठी ३१ जानेवारी २०२३ रोजी एक छोटी सूचना जाहीर केली होती. याची नोंदणी प्रक्रिया ८ फेब्रुवारी २०२३ पासून सुरु झाली असून २३ फेब्रुवारी २०२३ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
पदभरतीचा तपशील जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा