आरोपी आनंदकुमार गणेशन हा गटार साफ करायचे काम करत होता. तर मृतक आकाश हा अंबरनाथ रेल्वे स्थानकाबाहेर भाजी विक्रीचे काम करत होता. मात्र त्याने आपल्याच पोटच्या अल्पवयीन मुलाची इतक्या निर्दयीपणे हत्या का केली याचे कारण अद्यापही समोर आले नसल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. या घटनेचा अधिक तपास अंबरनाथ पोलीस करीत आहेत.
या घटनेबाबत पोलीस सूत्राने दिलेल्या अधिक माहितीनुसार, अंबरनाथ पश्चिमेकडील स्वामी नगरमध्ये आरोपी आनंदकुमार गणेशन राहतो. त्याला तीन मुले असून आरोपी हा पत्नीपासून विभक्त राहत होऊन राहत आहे. दरम्यान, बुधवारी रात्रीच्या सुमारास आरोपी बापाने आकाशचा धारदार शस्त्राने गळा चिरून त्याची हत्या केली आणि गुरुवारी पहाटेच्या सुमारास त्याच परिसरात एका चहाच्या टपरी मागे असलेल्या मोठ्या नाल्यात त्याचा मृतदेह नाल्यात फेकून दिला.
मृतदेह नाल्यात फेकताना लोकांनी निर्दयी बापाला पाहिले
त्यातच काही नागरिकांनी आरोपी आनंदकुमार याला मुलाचा मृतदेह नाल्यात फेकताना पाहिले. त्यावेळी लोकांनी आरोपी आनंदकुमार याला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने नाल्यात मृतदेह टाकून तेथून पळ काढला. मात्र नागरिकांनी त्याचा पाठलाग करून त्याला पकडले आणि पोलिसांना सदर घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपीला ताब्यात घेतले व भादंवि कलम ३०२, २०१ प्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपी बापाला अटक केली आहे.