आयडीबीआय बॅंकेने जाहीर केलेल्या नोटिफिकेशननुसार, ग्रुप बी, ग्रुप सी आणि ग्रुप डीची एकूण ११४ पदे भरली जाणार आहेत. याअंतर्गत मॅनेजरची ४२ पदे, सहाय्यक महाव्यवस्थापकची २९ पदे, उपमहाव्यवस्थापकची १० पदे भरली जाणार आहेत. डेप्युटी जनरल मॅनेजर (DGM) (ग्रेड डी) साठी उमेदवाराचे वय ३५ ते ४५ वर्षांदरम्यान असावे. सहाय्यक महाव्यवस्थापक (एजीएम) (ग्रेड सी) साठी उमेदवारांचे वय २८ ते ४० वर्षांदरम्यान असावे. व्यवस्थापक (ग्रेड बी) पदासाठी उमेदवारांचे वय २५ ते ३५ वर्षांदरम्यान असावे.
जनरल/ओबीसी/ईडब्ल्यूएस पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना १ हजार रुपये अर्ज शुल्क तर अनुसूचित जाती/जमाती उमेदवारांना २०० रुपये अर्ज शुल्क भरावा लागेल.
पदभरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांनी रेझ्युमे, दहावी, बारावी आणि शैक्षणिक प्रमाणपत्रं, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी), ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) आणि पासपोर्ट साईझ फोटो हे दस्तावेज सोबत जोडणे आवश्यक आहे.
या पदासाठी आरक्षित वर्गातील उमेदवारांना पदभरती आणि वयोमर्यादेमध्ये सरकारी नियमानुसार सवलत देण्यात येणार आहे. याचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. तसेच उमेदवारांना संबंधित संस्थेने दिलेल्या अटी आणि शर्थींचे पालन करणे आवश्यक आहे.
यासाठी १५ फेब्रुवारीपासून अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून नोंदणी प्रक्रिया २१ फेब्रुवारीपासून सुरू होईल आणि ३ मार्च २०२३ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. उमेदवार आयडीबीआयच्या अधिकृत वेबसाइट idbibank.in वर ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर आल्यास अर्ज बाद करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्या.
पदभरतीचा तपशील पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा