यूजर्सकडून तक्रारी करण्यात आल्या आहेत की, सामना सुरू असताना अचानक ही सेवा ठप्प झाली आहे. Down detector वर सुद्धा अनेकांनी तक्रारी केल्या आहेत. यूजर्सच्या तक्रारीनुसार, Disney+ Hotstar ची सर्विस मोबाइल, लॅपटॉप किंवा टीव्ही अशा कोणत्याही प्लॅटफॉर्मवर अॅक्सेस करीत नाही.
वाचाः उन्हाळा येतोय, त्याआधीच ४७४ रुपयात खरेदी कारा Portable Mini Cooler, पाहा डिटेल्स
ओपन होत नाही वेबसाइट
Disney+ Hotstar ची सर्विस गेल्या एक तासांपासून डाउन आहे. कंपनीने अधिकृतपणे सर्विस डाउन झाल्या संबंधी कोणतीही माहिती दिली नाही. तसेच ओटीटी प्लॅटफॉर्म नव्हे तर कंपनीची वेबसाइट hotstar.com वर सुद्धा अॅक्सेस मिळत नाही. ही समस्या भारतातील प्रमुख शहरातील यूजर्सला येत आहे. डाउन डिटेक्टरच्या माहितीनुसार, ज्या यूजर्सला ही समस्या येत आहे. त्यात दिल्ली, लखनऊ, नागपूर, मुंबई, हैदराबाद आणि बेंगळुरू मधील यूजर्सचा समावेश आहे. या मोठ्या शहरातील यूजर्सला लॉगइन करण्यात अडचण येत आहे.
वाचाः Vivo Y56 5G स्मार्टफोन भारतात गुपचूप लाँच, पाहा किंमत-फीचर्स
ट्विटरवर करताहेत तक्रारी
ट्विटर वर यूजर्सकडून Disney+ Hotstar च्या सर्विस संबंधी डाउन झाल्याच्या तक्रारी केल्या जात आहेत. यूजर्स स्क्रीनशॉट सुद्धा पोस्ट करीत आहे. यूजर्सने टीव्हीचा व्हिडिओ सुद्धा शेअर करीत आहेत. ज्यात स्पष्ट दिसत आहे की, यूजर्सला सर्विस अॅक्सेस मिळत नाही. डिज्नी प्लस हॉटस्टार ओटीटी सेक्शन मध्ये खूप पॉप्यूलर आहे. यातील एक क्रिकेट मॅच सुद्धा आहे. या प्लॅटफॉर्मवर आयपीएल पासून मोठ्या मॅचचे टेलिकॉस्ट होत असतात. यामुळे हे खूप पॉप्यूलर आहे.
वाचाः WhatsApp ने एकाचवेळी लाँच केले तीन नवीन फीचर्स, पाहा कोणकोणते फायदे मिळणार