Pandharpur Vitthal Mandir: करोनाने मृत्यू झालेल्या व्यक्तीची अंतिम इच्छा पूर्ण; विठ्ठल मंदिराला १ कोटीचे दान!

हायलाइट्स:

  • करोनाने मृत्यू झालेल्या व्यक्तीची अंतिम इच्छा पूर्ण.
  • पत्नीने विठ्ठल मंदिराला दिले १ कोटी रुपयांचे गुप्तदान.
  • मंदिरातील कर्मचाऱ्याकडून माहिती झाली लीक.

पंढरपूर: गोरगरिबांचा देव अशी ओळख असलेल्या पंढरीच्या विठुरायाला एका महिला भाविकाने पतीची अंतिम इच्छा पूर्ण करण्यासाठी एक कोटी रुपयाचे गुप्तदान दिले आहे. मंदिराच्या इतिहासात ही मंदिराला मिळालेली सर्वात मोठी देणगी आहे. ( Pandharpur Vitthal Mandir Donation News )

वाचा: उद्धव ठाकरे यांचा ‘तो’ निरोप राहुल गांधींना दिला; राऊतांचे सूचक विधान

मुंबई येथील एक तरुण विठ्ठलभक्त करोना संसर्गाची लागण होऊन दोन महिन्यांपूर्वी हे जग सोडून गेला. विठ्ठलावर असलेल्या अपार श्रद्धेमुळेच त्याने मृत्यूसमयी आपली पत्नी आणि आईला बोलावून निधनानंतर विमा कंपनीकडून येणारी सर्व रक्कम विठुरायाला अर्पण करण्याची अंतिम इच्छा व्यक्त केली. दुर्दैवाने यानंतर काही दिवसांतच या विठ्ठल भक्ताचे निधन झाले. पतीच्या निधनानंतर खरे तर विम्याची येणारी रक्कम विधवा पत्नी आणि लहान मुलींसाठी उपयोगी ठरली असती. मात्र पतीची अंतिम इच्छा पूर्ण करण्यासाठी या विधवा पत्नीने विमा कंपनीकडून आलेले १ कोटीची रक्कम मंदिराला देण्याचा निर्णय घेतला.

वाचा: दरडग्रस्तांना दिलेले धनादेश परत घेतले; दरेकरांनी सरकारला केला ‘हा’ सवाल

पंढरपूर शहरात आषाढी यात्रेची संचारबंदी संपल्यावर आठ दिवसांपूर्वी ही महिला आपली मुलगी आणि सासूला घेऊन विठ्ठल मंदिरात पोहचली. आपल्या पतीच्या इच्छेप्रमाणे विठुरायाच्या चरणी गुप्तदान देण्याचे तिने मंदिर प्रशासनाला सांगितले. माझ्या पतीचे निधन झाले असून पतीच्या इच्छेनुसार आपण एक कोटी रुपयांची देणगी दिल्याची माहिती बाहेर आल्यास आपल्या कुटुंबाला त्रास होऊ शकेल. त्यामुळे आपले अथवा आपल्या दिवंगत पतीचे नाव आणि देणगी रक्कम गुप्त ठेवण्याची विनंती या विधवा पत्नीने केली होती. त्यानुसार मंदिराकडून गेल्या आठ दिवसांत याबाबत कोणतीच माहिती मिळू शकलेली नव्हती. दरम्यान आज एका कर्मचाऱ्याकडून ही माहिती लीक झाली आणि प्रसारमाध्यमांपर्यंत पोहचली

मंदिर प्रशासनाकडे याबाबत विचारणा केली असता या १ कोटीच्या देणगीबाबत दुजोरा मिळाला असून या महिलेने १० लाखाचे १० चेक मंदिर प्रशासनाच्या ताब्यात दिले आहेत. विशेष म्हणजे या अनोख्या विठ्ठल भक्ताला मृत्यूच्या वेळीही आपली पत्नी आणि लहान मुलीच्या भवितव्यापेक्षा देवावरची श्रद्धा मोठी वाटली. तसेच त्याच्या विधवा पत्नीलाही आपल्या पतीच्या मृत्यूनंतर आपले आणि आपल्या लहानग्या मुलीच्या भविष्यापेक्षा पतीचा अखेरचा शब्द पाळणे महत्वाचे वाटले, याचं विशेष कौतुक होत आहे.

वाचा: नाना पटोलेंचा शिवसेनेला जोरदार धक्का; ‘या’ माजी मंत्र्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश

Source link

pandharpur vitthal devotee latest newspandharpur vitthal devotees donationpandharpur vitthal mandir donationpandharpur vitthal mandir donation newspandharpur vitthal mandir newsकरोनापंढरपूरमुंबईविठ्ठलविठ्ठलभक्त
Comments (0)
Add Comment