Success Story: अनुपमा दुसऱ्या प्रयत्नात बनली IAS, ‘ही’ रणनिती तुम्हालाही येईल उपयोगी

Success Story:यूपीएससी नागरी सेवा परीक्षेत यशस्वी झालेल्या प्रत्येक व्यक्तीची स्वतःची कहाणी असते. ही कहाणी वाचून पुढच्या लाखो तरुणांना परीक्षेची प्रेरणा मिळते. देशातील सर्वात कठीण परीक्षा त्याने कशी पार पाडली आणि या दरम्यान त्याने कोणती रणनीती अवलंबली, हे जाणून घेण्याची इच्छा अनेकांना असते. यूपीएससी उत्तीर्ण केलेल्या प्रत्येकाचा एक स्वतत्र प्रवास असतो. आज आपण अशा व्यक्तिमत्त्वाची ओळख करून देणार आहोत, जिने इंजिनीअरिंगनंतर यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली. असे करताना तिला पहिल्याच प्रयत्नात अपयश आले. पण तिने हार मानली नाही. त्यानंतर केलेल्या दुसऱ्या प्रयत्नात तिला परीक्षेत यश मिळाले आणि ती आयएएस झाली. अनुपमा अंजली असे तिचे नाव आहे. अनुपमाने हा प्रवास कसा गाठला आणि या काळात तिची रणनीती काय होती ते जाणून घेऊया.

अनुपमा अंजली ही दिल्लीची राहणारी आहे. तिने आपले सुरुवातीचे शिक्षण दिल्लीतूनच पूर्ण केले. यानंतर तिने मेकॅनिकल शाखेत इंजिनीअरिंगची पदवी घेतली आहे.

इंजिनीअरिंगनंतर यूपीएससी परीक्षेची तयारी

इंजिनीअरिंगनंतर अनुपमाने यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेची तयारी सुरू करण्याचा निर्णय घेतला. या दरम्यान तिने प्रथम संपूर्ण अभ्यासक्रम चांगल्या प्रकारे समजून घेतला आणि नंतर पुस्तकांची यादी तयार करून तयारी सुरू केली.

First Indian Woman Pilot: स्वतंत्र भारताच्या पहिल्या महिला पायलट उषा सुंदरम यांच्याविषयी जाणून घ्या

वडिलांकडून प्रेरणा

अनुपमा अंजलीला तिच्या वडिलांकडून यूपीएससी परीक्षेची तयारी करण्याची प्रेरणा मिळाली. तिचे वडील आयपीएस अधिकारी आहेत. त्यामुळे तयारीच्या वेळी तिच्या वडिलांनी तिला खूप मदत केली.

दुसऱ्या प्रयत्नात मिळवली रॅंक

अनुपमाने यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेसाठी पूर्ण तयारीनिशी पहिलाच प्रयत्न केला होता पण त्यात ती यशस्वी होऊ शकली नाही. यामुळे ती खूप अस्वस्थ झाली. पण तिने धीर सोडला नाही. दुसऱ्यांदा प्रयत्न केला आणि यावेळी तिने परीक्षेत ३८६ रँक मिळविला. यासह ती आयएएस अधिकारी बनली.

Success Story: वडीलांसोबत गावागात फिरून कपडे विकायचा, IAS अधिकारी अनिलच्या संघर्षाची प्रेरणादायक कहाणी
Career Story: पाकिस्तानात हिंदू मुलीने रचला इतिहास, डॉ. सना गुलवानीच्या करिअरबद्दल जाणून घ्या

Source link

Anupama AnjaliAnupama Anjali Success StoryIAS Success Storysuccess storyupsc 2023 notificationUPSC CCE Exam 2023upsc cse 2023upsc cse 2023 notificationUPSC CSE Exam 2023UPSC Exam Tipsupsc notification 2023अनुपमा अंजलियूपीएससी
Comments (0)
Add Comment