Pravin Darekar: दरडग्रस्तांना दिलेले धनादेश परत घेतले; दरेकरांनी सरकारला केला ‘हा’ सवाल

हायलाइट्स:

  • रत्नागिरीतील पोसरे दरडग्रस्तांची व्यथा.
  • सरकारने दिलेले धनादेश परत घेतले.
  • प्रवीण दरेकर यांनी सरकारवर डागली तोफ.

मुंबई:रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमधील पोसरे येथे दरडग्रस्तांना देण्यात आलेला मदतीचा धनादेश दुसऱ्याच दिवशी परत घेण्यात आला असून यावरून विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर तसेच भाजप महाराष्ट्र प्रदेश सचिव निलेश राणे यांनी राज्य सरकार आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब यांच्यावर तोफ डागली आहे. ( Ratnagiri Posare Landslide Latest News )

वाचा:उद्धव ठाकरे यांचा ‘तो’ निरोप राहुल गांधींना दिला; राऊतांचे सूचक विधान

रत्नागिरीच्या पालकमंत्र्यांनी पूरग्रस्तांना दिलेले चेक काढून घेतले असतील आणि चेक नंतर देणार असे सांगितले असेल तर ते दुर्दैव आहे. म्हणजेच संकटात असलेल्या पूरग्रस्तांची थट्टा पालकमंत्री आणि सरकार करत आहे, असं यातून स्पष्टच दिसत आहे, असे नमूद करत प्रवीण दरेकर यांनी पूरग्रस्तांसाठी जाहीर करण्यात आलेल्या पॅकेजवर बोट ठेवले. सरकारने पूरग्रस्तांसाठी ११ हजार ५०० कोटी रुपयांचे जे पॅकेज जाहीर केले आहे त्याचंही असंच केलं जाणार आहे का?, असा खरमरीत सवाल विचारताना पूरग्रस्तांना छोटी रक्कम मिळवण्यासाठीही प्रतीक्षा करावी लागत असेल तर सरकार किती संवेदनशील आहे हे यातून दिसते. एकूणच सरकारने पूरग्रस्तांची थट्टा लावली आहे, असे टीकास्त्र दरेकर यांनी सोडले.

वाचा: नाना पटोलेंचा शिवसेनेला जोरदार धक्का; ‘या’ माजी मंत्र्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश

ठाकरे सरकारचे ‘गिव्ह अँड टेक’ म्हणजे…

निलेश राणे यांनी ट्वीटरच्या माध्यमातून या प्रकारावर संताप व्यक्त केला. ‘गिव्ह अँड टेक’ चा अर्थ एका हाताने घ्या आणि दुसऱ्या हाताने द्या. ठाकरे सरकारचा ‘गिव्ह अँड टेक’ म्हणजे एक दिवस द्या आणि दुसऱ्या दिवशी तेच परत घ्या. दरडग्रस्तांची क्रूर चेष्टा केली आहे ठाकरे सरकारने’ असे नमूद करत अत्यंत टोकाची भाषा वापत निलेश राणे यांनी सरकारला लक्ष्य केले.

नेमकं काय घडलं?

रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील पोसरे गावात दरड कोसळून १७ जणांचा मृत्यू झाला आहे. या मृतांच्या वारसांना पालकमंत्र्यांच्या हस्ते मदतीचे धनादेश देण्यात आले. मात्र दुसऱ्याच दिवशी हे धनादेश तलाठी परत घेऊन गेल्याचा आरोप करण्यात आला आहे. बँक खात्यात पैसे जमा झालेले नसल्याने हे धनादेश परत घेतल्याचे सांगण्यात येत असले तरी त्यावरून सरकारवर चौफेर टीका होऊ लागली आहे.

वाचा:‘राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र येणार यात काहीच शंका नाही’

Source link

maharashtra flood relief fund updatesnilesh rane on ratnagiri posare landslidepravin darekar latest newspravin darekar on flood relief fundratnagiri posare landslide latest newsअनिल परबनिलेश राणेपोसरेप्रवीण दरेकरत्नागिरी
Comments (0)
Add Comment