छत्रपती शिवाजी महाराजांसमोर जेव्हा सुभेदाराच्या सुंदर सुनेला हजर केले..तुम्हीही म्हणणार ‘शिवाजी महाराज की जय’

आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती असून, या वर्षी जयंती जल्लोषात साजरी करत आहे. छत्रपती शिवाजी महाराज अतिशय चारित्र्यसंपन्न होते. जगाच्या इतिहासात हे एकमेव राजा आहे, ज्यांच्या दरबारी कधी स्त्री किंवा नर्तकी नाचली नाही. महाराजांनी स्वतःसाठी मोठे महाल बांधले नाहीत. सत्तेचा वापर स्वतःच्या किंवा कुटुंबाच्या फायद्यासाठी केला नाही. शिवाजी महाराज नेहमी ‘रयतेच स्वराज्य’ असाच शब्द वापरत. आज त्यांचा परस्त्रीयांविषयीचा दृष्टीकोन संबंधी आपण एक किस्सा जाणून घेऊया…

हात पाय तोडायची शिक्षा


महाराजांच्या स्वभावातील आणखी एक महत्त्वाचा गुणविशेष म्हणजे त्यांचा स्त्रियांविषयी चा दृष्टिकोन. राजेशाहिमध्ये गरीब स्त्रिच्या अब्रुला किंमत नव्हती, स्त्रीला फक्त उपभोग्य वस्तूच समजले जायचे. रांझ्याच्या पाटलाने आपल्या पाटीलकीचा आव आणत अशाच एका गरीब शेतकऱ्याच्या मुलीची अब्रु लुटली म्हणून राजांनी वस्तुस्थिती जाणून घेऊन विलंब न करता हात पाय तोडायची शिक्षा फर्मावली. रयतेसाठी हे नविनच होते, बदल जाणवू लागला.

डोळे काढण्याची शिक्षा

आणखी एक घटना आहे, १६७८ मध्ये सकुजी गायकवाड या शिवरायांच्या सरदार ने बेळवाडीला जिंकण्यासाठी किल्ल्याला वेढा दिला. किल्लेदार सावित्री देसाई नावाची एक स्त्री होती. तब्बल महिनाभर तिने लढा दिला शेवटी हरली. पण शत्रू भावनेच्या उन्मादात सकुजी ने त्या स्त्री वर बलात्कार केला. महाराजांच्या कानी ही गोष्ट पडताच त्यांनी तात्काळ सकुजीचे डोळे काढण्याची शिक्षा देऊन आयुष्यभरासाठी तुरूंगात डांबले. शत्रू असो वा कोणत्याही धर्मातील स्त्री यांचा सन्मान करण्यात यावा अशी सक्त ताकिद राजांनी दिली होती.

आईसमान दर्जा

महाराजांसमोर कल्याणच्या सुभेदाराच्या सुंदर सुनेला सैनिकांनी हजर केले तेव्हा त्यांनी मातेचा दर्जा देऊन सन्मान केला. वस्त्र अलंकार देऊन रवाना केलं. बखरीमध्ये देखील या घटनेची नोंद आढळते. तसेच यावेळी त्यांनी असे म्हटले की, अशीच आमची आई असती सुंदर रूपवती, आम्हीही सुंदर झालो असतो वदले छत्रपती! या घटनेचे रणजित देसाई यांच्या श्रीमान योगी या पुस्तकातही वर्णन केलेले आहे.

पण सध्या वर्तमानात आपल्या दुष्कृत्यांवर पांघरूण घालण्याचे, त्यांना पाठिशी घालण्याचे काम आपल्याला उघड्या डोळ्याने बघावे लागत आहे. हाथरस ची घटना असो की कठुआ ची असो, की महाराष्ट्रातील एखादी घटना असो, शिवाजी महाराजांचे नाव घेणाऱ्यांना त्यांचे रूप माहिती नाही का? की फक्त महाराजांचा वापर आपल्या सोईपुरता, फायद्यापुरता व त्यांच्या नावाने धर्मांधता पसरविण्यापुरताच करायचा का? असे प्रश्न पडणे व विचारणे साहजिक आहे.

Source link

chhatrapati shivaji maharaj articlerespect for womenshivaji maharajshivaji maharaj story in marathiइतिहासकल्याणच्या सुभेदाराची सुनछत्रपती शिवाजी महाराजछत्रपती शिवाजी महाराज जयंतीपरस्त्रीयांचा आदर करणारे शिवरायशिवाजी महाराज की जय
Comments (0)
Add Comment