HSC Exam: बारावी परीक्षा उद्यापासून; परीक्षा केंद्रावर कलम १४४ लागू, उल्लंघन केल्यास होणार मोठी कारवाई

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बारावी परीक्षेला मंगळवारपासून सुरुवात होणार आहे. कोव्हिडनंतर दोन वर्षांनी नियमित पद्धतीने परीक्षा होत आहे. मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतून दोन लाख ६० हजार विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. परीक्षा केंद्रे म्हणून ६५४ उच्च माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालये निश्चित करण्यात आली आहेत. विभागीय शिक्षण मंडळ कार्यालयातून परिरक्षक कार्यालयात (कस्टडी) प्रश्नपत्रिका पोहचविण्याची प्रक्रिया रविवारी उशिरापर्यंत सुरू होती. निर्धारित वेळेपूर्वी १० मिनिटे आधी प्रश्नपत्रिकेची सुविधा रद्द करण्यात आली आहे. सकाळी १०.३० व दुपारी २.३० नंतर विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश नसणे अशा काही बदलांसह विद्यार्थी परीक्षेला सामोरे जाणार आहेत.

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे बारावी परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू होत आहेत. विभागीय शिक्षण मंडळ कार्यालयातून परीक्षेची तयारी रविवारी सायंकाळपर्यंत सुरू होती. प्रश्नपत्रिकांच्या पेट्या परिरक्षक कार्यालयात पोहचविण्याची प्रक्रिया अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली सुरू होती. कस्टडीत प्रश्नपत्रिकेवर पोलिसांची नजर असणार आहे. शिक्षण मंडळाने परीक्षेची सर्व तयारी पूर्ण केली आहे.

कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा पार पडावी, यासाठी खबरदारी घेतली जात आहे. परीक्षेसाठी औरंगाबाद विभागातून एक लाख ६८ हजारांपेक्षा अधिक, तर लातूर विभागातून ९२ हजार विद्यार्थ्यांनी परीक्षेला नोंदणी केली आहे. यंदा निर्धारीत वेळेपूर्वी १० मिनिटे आधी प्रश्नपत्रिकेची सुविधा रद्द करण्यात आली. यासह सकाळी १०.३० व दुपारी २.३० नंतर विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही. करोनानंतर दोन वर्षांनी नियमित पद्धतीने परीक्षा होत आहे. करोनानंतर प्रत्यक्ष तासिका दोन वर्षे झाल्या नाहीत. ऑनलाइन शिक्षणात अनेक विद्यार्थ्यांना लिखाणाचा सराव कमी झाला. हे लक्षात घेऊन औरंगाबाद माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाने जिल्ह्यात तीन सराव परीक्षा घेण्यात आल्या. शाळा, महाविद्यालय स्तरावरही सराव परीक्षांवर अधिक भर देण्यात आला. इतर अनेक जिल्ह्यांमध्येही सराव परीक्षांचा प्रयोग राबविण्यात आला. यंदा शिक्षण मंडळासह कॉपीमुक्त परीक्षेसाठी मंडळासह महसूल, पोलिस विभागासह इतर विभागांचीही नजर असणार आहे.

जीपीएस ट्रॅकिंग

परीक्षेतील प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका वितरणाचे जीपीएस ट्रॅकिंग होणार आहे. सहायक परिरक्षकावर त्याची जबाबदारी असणार आहे. याद्वारे परिरक्षक कार्यालयातून प्रश्नपत्रिका केव्हा स्वीकारली, परीक्षा केंद्रांवर केव्हा प्रश्नपत्रिका पोहचल्या याचे ट्रॅकिंग होणार आहे. परीक्षा कक्षात प्रश्नपत्रिकांचे पाकिट दिल्यानंतरही छायाचित्रण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

दहा मिनिटांचा वेळ अधिक

यंदापासून १० मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका देण्याचा निर्णय शिक्षण मंडळाने रद्द केला आहे. यासह मंडळाने निर्धारित वेळेनंतर दहा मिनिटे अधिक कालावधी देण्याचा निर्णय घेतला आहे. शिक्षण मंडळाकडून विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका निर्धारित वेळेच्या दहा मिनिटे अगोदर दिल्या जात होते. यंदापासून नियमात बदल करून ही सुविधा रद्द करण्यात आली. निर्धारित वेळेनंतर दहा मिनिटांचा कालावधी विद्यार्थ्यांना वाढवून देण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिका लिहण्यास १० मिनिटे अधिक वेळ मिळणार आहे.

महत्त्वाचे बदल

– प्रश्नपत्रिकेचे परीक्षा कक्षात वाटप निर्धारित वेळेत म्हणजेच ११ व ३ वाजता

– निर्धारित वेळेनंतर १० मिनिटे अधिक कालावधी.

– सकाळी १०.३० व दुपारी २.३० नंतर विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश नाही

– परीक्षा कक्षात उत्तरपत्रिकेवरील सूचना वाचून दाखवणार.

– प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिकांचे वितरणाचे ‘जीपीएस ट्रॅकिंग सिस्टिम’

– परीक्षा केंद्राच्या ५० मीटरच्या आत अनाधिकृत व्यक्तींना प्रवेश नाही

– परीक्षा केंद्रावर कलम १४४ अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश

– शंभर टक्के विद्यार्थ्यांची प्रवेशाच्या वेळी झडती घेणार

– परीक्षा केंद्रांवर बैठे पथके

– जिल्ह्यात शिक्षण विभागाची सहा, तर महसूल विभागाची १० पथके

-कॉपीमुक्त परीक्षेसाठी महसूल, ग्रामविकास विभागाची पथके

..

औरंगाबाद विभाग

परीक्षार्थी – १,६८,२६३

परीक्षा केंद्रे : ४३०

.

लातूर विभाग

परीक्षार्थी – ९१,६४१

परीक्षा केंद्रे – २२४

SSC HSC Exam: दहावी, बारावी परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी ‘तो’ निर्णय रद्द
जिल्हा शाळा-कॉलेज परीक्षा केंद्र विद्यार्थी

औरंगाबाद ४७० १५७ ६०४००

बीड २९८ १०१ ३८९२९

जालना २३३ ५९ २४३६६

परभणी २३९ ८० ३११२७

हिंगोली १२० ३३ १३४४१

लातूर ३३६ ९२ ३५५१०

नांदेड २८० ९२ ३९७७२

उस्मानाबाद १४९ ४० १६३५९

..

परीक्षेचा असा असेल वेळ

सकाळ सत्र… ११ ते २.१०

सकाळी सत्र.. ११ ते १.१०

सकाळी सत्र.. ११ ते १.४०

..

दुपारचे सत्र…………. ३ ते ६.१०

दुपारचे सत्र……. ३ ते ५.१०

दुपारचे सत्र…. ३ ते ५.४०

परीक्षेचे साहित्य केंद्रांना वितरीत झाले असून, तणावमुक्त आणि कॉपीमुक्त परीक्षेला विद्यार्थ्यांनी सामोरे जावे. परीक्षा केंद्रप्रमुखांना परीक्षेसंदर्भात विविध सूचना देण्यात आल्या आहेत.
– व्ही. व्ही. जोशी, विभागीय सचिव, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, औरंगाबाद

विद्यार्थ्यांनी कॉपीमुक्त, भयमुक्त वातावरणात परीक्षेला सामोरे जावे. शिक्षण मंडळाकडून परीक्षेची तयारी झाली आहे. भरारी पथकांची नेमणूकही करण्यात आली. यासह महसूल, ग्रामविकास विभागाचेही पथके असणार आहेत.
– सुधाकर तेलंग, विभागीय अध्यक्ष, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, लातूर

SSC HSC Exam: दहावी, बारावी प्रश्नपत्रिका ‘जीपीएस ट्रॅकिंग सिस्टिम’वर
दहावी, बारावीच्या लाखो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; निर्धारीत वेळेनंतर मिळणार अधिकचा कालावधी

Source link

12th examinationHSC ExamHSC Exam BoardHSC Exam CentreHSC Exam timetablemaharashtra state boardmaharashtra state board of secondary educationsecondary and higher secondary educationssc and hsc board exam 2023ssc and hsc exam 2023ssc hsc board exam newsssc hsc board maharashtraबारावी परीक्षा
Comments (0)
Add Comment