नवी दिल्लीः Facebook Instagram Blue Tick : सोशल मीडिया कंपन्यांकडून फ्री सर्विस बंद करण्याचा धडाका लावला आहे. काही दिवसापूर्वी ट्विटरकडून पेड ब्लू टिक सर्वस सुरू करण्यात आली होती. यासाठी कंपनी प्रति महिना ११ ते १४ डॉलर रुपये वसूल करीत आहे. आता ट्विटरच्या पावलावर पाऊल मेटा कंपनीने टाकले आहे. मेटाकडून एक घोषणा करण्यात आली आहे. फेसबुक आणि इंस्टाग्राम ब्लू टिक साठी चार्ज वसूल करणार आहे. याचाच अर्थ फेसबुक किंवा इंस्टाग्राम वर प्रीमियम व्हेरिफिकेशन सर्विस हवी असेल तर तुम्हाला सब्सक्रिप्शन मॉडलवर यावे लागेल. ट्विटरची मालकी मिळवल्यानंतर सर्वात आधी एलन मस्क यांनी हेच केले. त्यांनी फ्री मध्ये दिली जात असलेली ब्लू टिक सर्विस बंद केली होती.
दर महिना द्यावे लागतील इतके रुपये
मार्क झुकरबर्गने घोषणा केली आहे की, मेटाच्या मालकीच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम व्हेरिफाइड सर्विससाठी वेब यूजर्सला आता दर महिन्याला ११.९९ डॉलर आणि आयओएस यूजर्सला १४.९९ डॉलर या हिशोबाप्रमाणे चार्ज द्यावे लागतील. सध्या ही सर्विस ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड मध्ये सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे बाकीच्या देशात सुद्धा ही सर्विस लवकरच लाँच केली जावू शकते, असे बोलले जात आहे. आता ही सर्विस पूर्णपणे फ्री आहे. झुकरबर्गने म्हटले की, ही एक सब्सक्रिप्शन सर्विस आहे.

वाचाः पंख्यापेक्षाही स्वस्त कूलर, उन्हाची चटके बसण्याआधीच स्वस्तात खरेदी करा
काय असेल खास
इंस्टाग्राम आणि फेसबुक पेड सब्सक्रिप्शन मॉडलमध्ये यूजर्सला काही खास सर्विस ऑफर करण्यात येवू शकते. सोबत एचडी व्हिडिओ अपलोड करण्यासोबत अनेक अन्य सर्विस दिली जावू शकते. आतापर्यंत फेसबुक आणि इंस्टाग्राम वर प्रसिद्ध लोकांसाठी ब्लू टिक व्हेरिफिकेशन दिले जात होते. यात क्रिएटर्स, कंपन्या आणि ब्रँड्सचा समावेश होता.
वाचाः अर्ध्या किंमतीत खरेदी करा स्मार्टफोन, Amazon देत आहे शानदार ऑफर
वाचाः कमी किंमतीत फ्लॅगशीप स्मार्टफोन्स हवाय?; रेडमी, रियलमी, पोकोचे बेस्ट स्मार्टफोन, पाहा किंमत-फीचर्स