माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी, बारावी परीक्षेच्या अनुषंगाने आधीच तयारी सुरू केली होती. करोनानंतर नियमित परीक्षा होत असल्याने, परीक्षा केंद्र, बैठक व्यवस्थेची मंडळाकडून चाचपणी करण्यात आली. आठ डिसेंबरपासून पुन्हा जिल्हानिहाय बैठकांचे नियोजन करण्यात आले होते. विभागात दहावी, बारावी परीक्षेसाठी नोंदणी संख्या वाढली आहे.
या परीक्षेसाठी एकूण १४,५७,२९३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे. त्यामध्ये ७,९२,७८० विद्यार्थी, ६,६४,४४१ विद्यार्थीनी आहेत. एकूण १०,३८८ कनिष्ठ महाविद्यालयांमधून या विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली असून, या परीक्षेसाठी संपूर्ण राज्यात विद्यार्थ्यांसाठी ३१९५ मुख्य केंद्रांवर परीक्षा आयोजित करण्यात आली आहे.
शाखानिहाय विद्यार्थी संख्येचा तपशील खालीलप्रमाणे.
१) विज्ञान (Science) ६,६०,७८०
२) कला (Arts) ४,०४,७६१
३) वाणिज्य (Commerce) ३,४५,५३२
४) किमान कोशैल्यवर आधिकारीत अभ्यासक्रम ( व्यावसायिक अभ्यासक्रम) ( Vocational) ४२,९५९
५) टेक्निकल सायन्स (ITI) ३,२६१
एकूण विद्यार्थी संख्या — १४, ५७ , २९३
करोना प्रादुर्भावामुळे २०२१ ची दहावी, बारावी परीक्षा झाली नव्हती. त्यासाठी अंतर्गत मूल्यमापन गुणदान करण्यात आले होते. २०२२ मध्ये करोनाचा प्रादुर्भाव कायम होता. परीक्षा घेण्यात आली, परंतु शाळा तेथे केंद्र, २५ टक्के अभ्यासक्रम कमी, अधिकचा वेळ असे बदल मंडळाने केले होते. करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने २०२३ ची परीक्षा २०२० मध्ये झाली त्याप्रमाणे घेण्यासाठी मंडळाने तयारी केली आहे.
शाळा तेथे परीक्षा केंद्र नसणार. त्यामुळे परीक्षेची व्यवस्था पूर्ववत करण्यासाठी मंडळाची धांदल वाढली. शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, परीक्षार्थींची संख्या, विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था, सोयीसुविधांबाबतचा आढावा विभागीय पातळीवर निश्चित करण्यात आला.
यंदा दहावी, बारावीचे सुमारे वीस नवीन परीक्षा केंद्र वाढू शकतात, असे सांगण्यात येत आहे. दहावीसाठी विभागात पाच जिल्ह्यांत साडेसहाशेपेक्षा अधिक, तर बारावीचे पावणेचारशेपर्यंत परीक्षा केंद्र संख्या असतील असे सांगण्यात येते. जिल्हानिहाय बैठकांमधून परीक्षा केंद्रांचा पुन्हा आढावा घेतला जाणार आहे.