जिओचा सर्वात स्वस्त प्लान, वर्षभराची वैधता, ९०० जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग

नवी दिल्लीःReliance Jio Cheapest Recharge: रिलायन्स जिओकडे १ महिना, ३ महिने, ६ महिन्या शिवाय, वर्षभराचे प्रीपेड प्लान उपलब्ध आहेत. जिओच्या या प्लानची किंमत ३ हजार रुपयांपेक्षा कमी आहे. या प्लानमध्ये अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग ऑफर केली जाते. जिओच्या २९९९ रुपये आणि २८७९ रुपयाच्या दोन प्रीपेड प्लान मध्ये ३६५ दिवसाची वैधता मिळते. आज आम्ही तुम्हाला अशाच वर्षभराच्या प्लान संबंधी खास माहिती देत आहोत. जाणून घ्या डिटेल्स.

२ हजार ९९९ रुपयाचा प्लान

रिलायन्स जिओचा २ हजार ९९९ रपयाच्या प्लानची वैधता ३६५ दिवसाची प्लस २३ दिवसाची आहे. म्हणजेच जिओचा हा एकमेव प्लान आहे. जो वर्षभराहून जास्त वैधते सोबत येतो. जिओ यूजर्सला या प्लानमध्ये रोज २.५ जीबी डेटा ऑफर केला जातो. याचा अर्थ यूजर्सला एकूण ९१२.५ जीबी डेटा मिळतो. रोज मिळणारा डेटा संपल्यानंतर या डेटाची स्पीड 64Kbps राहते. रिलायन्स जिओच्या या प्रीपेड प्लानमध्ये अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग मिळते. म्हणजेच ग्राहकांना देशात कोणत्याही नेटवर्कवर लोकल, एसटीडी आणि रोमिंग कॉल करता येवू शकते. जिओचा हा रिचार्ज पॅक रोज १०० एसएमएस ऑफर करतो. रिलायन्स जिओच्या या प्लानमध्ये ५जीचा वापर करीत असलेल्या ग्राहकांना अनलिमिटेड ५जी डेटा मिळू शकतो. या प्लानमध्ये JioTV, JioCinema, JioSecurity आणि JioCloud चे अॅक्सेस फ्री मिळते.

वाचाः 5000mAh बॅटरी आणि ४८ मेगापिक्सलचे सर्वात स्वस्त स्मार्टफोन्स,

२ हजार ८७९ रुपयाचा प्लान
रिलायन्स जिओकडे २ हजार ८७९ रुपयाचा प्लान आहे. या प्लानची वैधता ३६५ दिवसाची आहे. या प्लानमध्ये डेली २ जीबी डेटा मिळतो. म्हणजेच ग्राहकांना एकूण ७३० जीबी डेटाचा फायदा मिळतो. या प्लानमध्ये मिळणारा रोजचा डेटा संपल्यानंतर याची स्पीड कमी होवून 64Kbps राहते. जिओच्या या रिचार्ज पॅक मध्ये अनलिमिटेड कॉलिंग मिळते. म्हणजेच ग्राहकांना देशात कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड लोकल, एसटीडी आणि रोमिंग कॉल करता येवू शकतात. या प्लानमध्ये JioTV, JioCinema, JioSecurity आणि JioCloud चे अॅक्सेस फ्री मिळते.

वाचाः १ मार्चला लाँच होणार Vivo V27 Series, पाहा कोणकोणत्या फोनची होणार एन्ट्री

Source link

Jio Cheapest Recharge PlanReliance Jio Cheapest RechargeReliance Jio Cheapest Recharge Planreliance jio planReliance Jio Recharge Planreliance jio recharge plans
Comments (0)
Add Comment