काय असते Renewed प्रोडक्ट ?
खरं म्हणजे अमेझॉनवर रोज हजारो प्रोडक्ट्स रिटर्न होत असतात. या रिटर्न प्रोडक्टला वारंवार ओपन करीत असल्याने त्यात स्क्रॅच येत असतात. यामुळे कंपनी त्या प्रोडक्ट्सला नवीन किंमतीत विकू शकत नाही. त्यामुळे या प्रोडक्ट्ला कमी किंमतीत विकले जाते. मग प्रश्न उभा राहतो की, हे असे प्रोडक्ट्स खरेदी करावे का, तर उत्तर होय आहे. अमेझॉन एक विश्वसनीय वेबसाइट आहे. या ठिकाणाहून कोणतेही प्रोडक्ट खरेदी करू शकता. रिन्यूड प्रोडक्ट अर्ध्या किंमतीपेक्षा कमी मध्ये मिळू शकते. त्यामुळे रिन्यूड प्रोडक्टला स्वस्तात खरेदी करता येवू शकते.
वाचाः १ मार्चला लाँच होणार Vivo V27 Series, पाहा कोणकोणत्या फोनची होणार एन्ट्री
खूपच स्वस्तात खरेदी करा रिन्यूड प्रोडक्ट्स
Dell Latitude E5470 लॅपटॉपची किंमत १.२९ लाख रुपये आहे. यावर ८६ टक्के डिस्काउंट दिली जात आहे. यानंतर या लॅपटॉपची किंमत १७ हजार ८९९ रुपये होते. या लॅपटॉपला अमेझॉनवरून खरेदी करू शकता. या लॅपटॉपला ८५५ रुपयाच्या ईएमआय ऑप्शनवर सुद्धा खरेदी करू शकता. लॅपटॉपच्या खरेदीवर निवडक बँड कार्डवर १३४२ रुपयाचा डिस्काउंट दिला जात आहे. सोबत ७ दिवसाची रिप्लेसमेंट पॉलिसी ऑफर केली जाते. जर तुम्हाला हे प्रोडक्ट पसंत पडले नाही तर तुम्ही ते परत करू शकता.
वाचाः १ मार्चला लाँच होणार Vivo V27 Series, पाहा कोणकोणत्या फोनची होणार एन्ट्री
डेल लॅपटॉपची स्पेसिफिकेशन्स
डेल लॅपटॉप मध्ये १४.१ इंचाचा मोठा डिस्प्ले मिळतो. यात २५६ जीबी स्टोरेज आणि ८ जीबी रॅम दिली आहे. लॅपटॉप Windows 10 Pro ऑपरेटिंग सिस्टम वर रन करतो. यात तुम्हाला इंटेल ग्राफिक्स मिळते. लॅपटॉप मध्ये Intel Core i5 6th Gen आणि 6200u प्रोसेसर सपोर्ट करतो.
वाचाः OnePlus 11R : 100W चार्जिंग, 16GB रॅमच्या वनप्लसच्या फोनची उद्यापासून प्री-ऑर्डर