Board Exam 2023: विज्ञान, कला, वाणिज्य, किमान कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम आणि आयटीआय या शाखांचे विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. यामध्ये, सर्वाधिक ७६,१०२ विद्यार्थी हे विज्ञान शाखेचे आहेत. परीक्षार्थ्यांत ७९,३३२ विद्यार्थी, ७६,५७१ विद्यार्थिनी आणि १० तृतीयपंथीयांचा समावेश आहे. नागपूर विभागातील एकूण ४८४ परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेण्यात येईल.
दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना प्रेरणादायक संदेश दे असे आवाहन एक यूजर्सने शाहरुखला केले. यावर किंग खानने त्याच्या स्टाइलमध्ये ट्विट केले आहे. शाहरुखच्या या उत्तराची सोशल मीडियावर चर्चा होत आहे.
एका युजरने ट्विटरवर मागणी केल्यानंतर शाहरुख खानने बोर्डाच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लिहिलं- जमेल तितका अभ्यास करा. काळजी करू नका. मी जुन्या काळी मोर्चच्या शेवटी शाळेत प्लेकार्ड घेऊन जायचो… तुम्ही तुमचे सर्वोत्तम द्या. बाकी सर्व सोडून द्या. फक्त ताण घेऊ नका. ऑल द बेस्ट.
बारावीच्या परीक्षांना सुरुवात
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात येणाऱ्या बारावीच्या लेखी परीक्षेला आज, मंगळवारपासून प्रारंभ होणार आहे. नागपूर विभागात एकूण एक लाख ५५ हजार ९१३ विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. २१ फेब्रुवारी ते २१ मार्च या एका महिन्याच्या कालावधीत ही परीक्षा घेण्यात येते आहे.
विज्ञान, कला, वाणिज्य, किमान कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम आणि आयटीआय या शाखांचे विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. यामध्ये, सर्वाधिक ७६,१०२ विद्यार्थी हे विज्ञान शाखेचे आहेत. परीक्षार्थ्यांत ७९,३३२ विद्यार्थी, ७६,५७१ विद्यार्थिनी आणि १० तृतीयपंथीयांचा समावेश आहे. नागपूर विभागातील एकूण ४८४ परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेण्यात येईल.
बारावीमध्ये टॉपर होता शाहरुख
मीडिया रिपोर्ट्सनुसार, बॉलीवूड किंग शाहरुख खान इयत्ता बारावीमध्ये टॉपर ठरला होता. त्याला बारावीत ८०.५% गुण मिळाले होते. त्याने दिल्लीच्या सेंट कोलंबिया स्कूलमधून इंटरमिजिएट केले. यानंतर त्यांनी अर्थशास्त्रात बॅचलर डिग्रीही मिळवली आहे. त्यांने दिल्ली विद्यापीठाच्या हंसराज कॉलेजमधून पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे.