Madhurani Prabhulkar Education: आई कुठे काय करते? (AAi kuthe kay karate) मालिकेतील अरुंधतीला आपलं राहिलेलं शिक्षण पूर्ण करायचं आहे. संसारात तिला काही ते जमलं नाही. पण आता तिने कॉलेजमध्ये जाऊन प्राचार्यांची भेटही घेतली होती पण पुढे तिला ते शक्य झालं नाही. दरम्यान ही भूमिका साकारणारी अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुलकर खऱ्या आयुष्यात कितवी शिकलीय, याबद्दल माहिती घेऊया.
मधुराणी गोखले प्रभुलकर ही आपल्या उत्तम अभिनयासोबतच सिंगर आणि म्युसिक कंम्पोसर म्हणून ओळखली जाते. तिचा जन्म भुसावळचा आहे. मराठी टेलिव्हिजनवरील आई कुठे काय करते मालिकेतील अरुंधती देशमुख या कॅरेक्टरमुळे ती घराघरात पोहोचली आहे. मधुराणी गोखले प्रभुलकरने आपले शालेय शिक्षण पुण्याच्या एच.एच.सी.पी हायस्कूलमधून पूर्ण केले. १६ वर्षाची असताना तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. तिने स्वत:साठी लिहिलेल्या सी-सॉ स्क्रिप्टला पुरुषोत्तम करंडक या मानाच्या स्पर्धेत पारितोषिक मिळाले.

मधुराणी गोखले प्रभुलकरने पुण्याच्या एस.पी.कॉलेजमधून आपले ग्रॅज्युएशन पूर्ण केले. तिला कविता लिहिणं आणि कादंबरी वाचण्याची आवड आहे. तिचा जन्म आणि पुढील जडणघडण ही भुसावळमध्येच झाली. तिने आपला पती प्रमोद प्रभुलकर याच्यासोबत मिळून मिरॅकल अॅक्टींग अॅकेडमी नावाने स्वत:ची अभिनय कार्यशाळा सुरु केली.
आई कुठे काय करतेमधील तिच्या कॅरेक्टरला स्टार प्रवाह परिवार २०२१ चा बेस्ट कॅरेक्टर अॅवार्ड मिळाला होता. २००४ मध्ये आलेल्या नवरा माझा नवसाचा आणि २०१० मधील मणी मंगळसूत्र या सिनेमांतून तिने अभिनय केला.
सारेगमपामध्येही ती सहभागी झाली होती. सुंदर माझं घर या मराठी सिनेमासाठी तिने म्युझिक कम्पोझ केले होते. २००३ मध्ये गोड गुपित नावाच्या मराठी सिनेमाची निर्मिती केली होती.