सुरभी आनंद ही सर्वोच्च न्यायालयात वकील आहे. ती स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबातील आहेत. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात ‘कोसीचे गांधी’ म्हणून प्रसिद्ध असलेले तिच्या पणजोबा राम बहादूर सिंह, आजोबा माणिक प्रसाद सिंह आणि मोठे आजोबा ब्रह्मचारी बाबू यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.
सुरभी आनंदच्या शालेय शिक्षणाबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही. सुरभी आनंदने पुण्याच्या सिम्बायोसिस लॉ स्कूलमधून कायद्याची पदवी घेतली आहे. राजहंस सिंग आणि सुरभी आनंद यांचे कुटुंबीय एकमेकांना अनेक वर्षांपासून ओळखतात. राजहंस आणि सुरभीचा भाऊ चेतन आनंद चांगले मित्र आहेत.
सुरभी आनंद भारताच्या सर्वोच्च न्यायालयात प्रॅक्टिस करते. कायद्याच्या विश्वातील प्रसिद्ध व्यक्तिमत्व राम जेठमलानी यांच्याकडून तिने कायद्याचे बारकावे शिकले आहेत. सुरभी आनंदच्या इंस्टाग्राम पोस्टनुसार ती सध्या पाटणा हायकोर्टात प्रॅक्टिस करत आहे. वडील आनंद मोहन तुरुंगात गेल्यानंतर, सुरभी आणि तिच्या भावाचे पालनपोषण आणि शिक्षण तिची आई लवली आनंद यांनी केले.
सुरभी आनंद आणि राजहंस सिंह यांच्या लग्नाची चांगलीच चर्चा होती. त्यांच्या लग्नासाठी सुमारे १५ हजार पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले होते. या शाही लग्नात बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे वधू-वरांना आशीर्वाद देण्यासाठी पोहोचले होते. सुरभी आनंद-राजहंस सिंहचे लग्न बैरिया कर्णपुरा गावातील विश्वनाथ फार्म हाऊसमध्ये झाले आहे. या लग्नासाठी सुरभी आनंदचे वडील आनंद मोहन पॅरोलवर तुरुंगातून बाहेर आले होते.