Poco C55 स्मार्टफोन भारतात लाँच, २८ फेब्रुवारीपासून विक्री, डिस्काउंट-ऑफर मिळणार

नवी दिल्लीःPOCO C55 स्मार्टफोनला भारतात लाँच करण्यात आले आहे. हा फोन MediaTek Helio G85 चिपसेट आणि 50MP ड्युअल कॅमेरा सेटअप सोबत येतो. पॉवर बॅकअपसाठी फोनमध्ये 5,000 mAh ची बॅटरी दिली आहे. हा फोन एक व्हॅल्यू फॉर मनी फोन आहे. या फोनला भारतात १० हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत लाँच केले आहे. फोनला तीन शानदार कलर्स फॉरेस्ट ग्रीन, कूल ब्लू आणि पॉवर ब्लॅक मध्ये आणले गेले आहे. पोकोच्या या फोनची २८ फेब्रुवारी पासून विक्री सुरू केली जाणार आहे. या फोनला ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवरून खरेदी करू शकता.

फोनची किंमत आणि ऑफर्स
या फोनच्या ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेजच्या व्हेरियंटची किंमत ९ हजार ४९९ रुपये आहे. तर ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १० हजार ९९९ रुपये आहे. स्मार्टफोनच्या पहिल्या ५०० ग्राहकांना १५०० रुपयाची सूट मिळू शकते. कंपनी ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजच्या फोनला पहिल्या दिवशी खरेदी केल्यानंतर ५०० रुपयांचा डिस्काउंट मिळू शकतो. सोबत बँक ऑफर मध्ये ५०० रुपये ते १ हजार रुपयाची सूट दिली जावू शकते. ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेजच्या व्हेरियंटला ८ हजार ४९९ रुपये किंमतीत खरेदी करू शकता. ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनला ९९९९ रुपये किंमतीत खरेदी करू शकता.

वाचाः मोदी है तो मुमकीन है! सेमीकंडक्टर प्लांट गुजरातमध्ये होणार, हे फायदे मिळणार

फोनची स्पेसिफिकेशन्स

POCO C55 स्मार्टफोनमध्ये एक मोठा ६.७१ इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. फोनच्या रियर पॅनेलवर ड्युअल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. याचा मेन कॅमेरा ५० मेगापिक्सलचा आहे. फोनमध्ये MediaTek Helio G85 चिपसेट सपोर्ट दिला आहे. सोबत Mali-G52 GPU 1 गीगाहर्ट्ज सपोर्ट दिले आहे. हा फोन POCO C55 Android 12 वर रन करतो. याचा AnTuTu स्कोर 260K पेक्षा जास्त आहे. फोनचा आयपी रेटिंग IP52 आहे. POCO C55 स्मार्टफोनच्या फ्रंट मध्ये 5MP चा कॅमेरा सेन्सर मिळतो. फोनमध्ये 5000mAh ची मोठी बॅटरी दिली आहे. 10W फास्ट चार्जरने चार्ज करू शकता.

वाचाः OnePlus 11R ची आजपासून प्री-बुकिंग सुरू, ६ हजाराचे OnePlus Buds Z2 फ्री

Source link

POCO C55POCO C55 featuresPoco C55 launchedPOCO C55 pricePOCO C55 saleपोको स्मार्टफोन
Comments (0)
Add Comment