UPSC EPFO Job 2023: कामगार मंत्रालयात नोकरी करण्याची संधी, ‘येथे’ पाठवा अर्ज

UPSC EPFO Job 2023: कामगार आणि रोजगार मंत्रालयात नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी सुवर्णसंधी आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेअंतर्गत एनफोर्समेंट ऑफिसर आणि सहाय्यक आयुक्तच्या ५७७ पदांच्या भरतीसाठी यूपीएससीकडून मागविण्यात येत आहेत. यासाठी एक नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे. या पदांसाठी अर्ज करणारे उमेदवार ऑनलाइन माध्यमातून अर्ज करु शकतात.

अर्ज करणाऱ्या ओबीसी/ईडब्ल्यूएस उमेदवारांकडून २५ रुपये अर्ज शुल्क घेण्यात येईल. एससी/एसटी/पीडब्ल्यूडी आणि महिला उमेदवारांकडून कोणतेही शुल्क घेण्यात येणार नाही.

EO/AO साठी १८ ते ३० वर्षे आणि APFC पदांसाठी १८ ते ३५ वर्षे इतकी वयोमर्यादा आहे. वयाची गणना करण्यासाठी महत्त्वाची तारीख १७ मार्च आहे. उमेदवारांना सरकारी नियमांनुसार वयात सवलत दिली जाईल. या पदांसाठी अर्ज करणारे उमेदवार मान्यताप्राप्त मान्यताप्राप्त संस्था किंवा विद्यापीठातून पदवीधर असणे आवश्यक आहे.

लेखी परीक्षा, मुलाखत, दस्तऐवज सत्यापन आणि वैद्यकीय चाचणीच्या अंतर्गत उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

पदभरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांनी रेझ्युमे, दहावी, बारावी आणि शैक्षणिक प्रमाणपत्रं, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी), ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) आणि पासपोर्ट साईझ फोटो हे दस्तावेज सोबत जोडणे आवश्यक आहे.

IDBI Job: आयडीबीआय बँकेत विविध पदांची भरती, लाखोंमध्ये मिळेल पगार
या पदासाठी आरक्षित वर्गातील उमेदवारांना पदभरती आणि वयोमर्यादेमध्ये सरकारी नियमानुसार सवलत देण्यात येणार आहे. याचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. तसेच उमेदवारांना संबंधित संस्थेने दिलेल्या अटी आणि शर्थींचे पालन करणे आवश्यक आहे.

अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर आल्यास अर्ज बाद करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्या.

यूपीएससी ईपीएफओ भरतीसाठी २५ फेब्रुवारी २०२३ पासून अर्ज प्रक्रिया सुरु होत आहे. १७ मार्च २०२३ ही ऑनलाइन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे.
पात्र आणि इच्छुक उमेदवार UPSC च्या अधिकृत वेबसाइट upsconline.nic.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.

पदभरतीचा तपशील पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा

Agniveer Job: भारतीय सैन्याकडून देशभरात बंपर भरती; आठवी, दहावी उत्तीर्णांना नोकरीची संधी
NPCIL Job: बारावी उत्तीर्णांना न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशनमध्ये नोकरीची संधी, ‘येथे’ पाठवा अर्ज

Source link

assistant commissionerCentral Govt JobsEPFO BhartiEPFO Job 2023EPFO Jobsgolden opportunityGovt JobsGovt Jobs 2023labor ministryLatest Govt JobsMaharashtra TimesMinistry of Laboursalary goodupscUPSC EPFO Recruitment 2023upsc jobupsc vacancyupsc.gov.inकामगार मंत्रालयात नोकरी
Comments (0)
Add Comment