Airtel चा जोरदार झटका, सर्वात स्वस्त प्लान केला ५७ टक्के महाग

नवी दिल्लीः Airtel ने आपल्या यूजर्सला जोरदार झटका दिला आहे. एअरटेलने महाराष्ट्र आणि केरळमधील १९ सर्कलमधील ९९ रुपयाचा आपला बेस रिचार्ज प्लान हटवला आहे. म्हणजेच आता या राज्यातील यूजर्सला आपले सीम अॅक्टिव्ह ठेवण्यासाठी कमीत कमी १५५ रुपयाचा रिचार्ज करावा लागणार आहे. कंपनीने गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात ९९ रुपयाचा प्लान बंद करणे सुरू केले आहे. गेल्या काही महिन्यापासून टेलिकॉम कंपन्यांच्या रिचार्ज प्लानच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे.

१५५ रुपयाचा प्लान

एअरटेल कंपनीने सर्वात आधी ओडिशा आणि हरियाणा मध्ये या प्लानला बंद केले होते. नंतर जानेवारी २०२३ मध्ये एअरटेलने आंध्र प्रदेश, बिहार, हिमाचल प्रदेश, राजस्थान, पूर्वोत्तर कर्नाटक आणि यूपी – पश्चिम मध्ये ९९ रुपयाचा आपला बेस रिचार्ज प्लान हटवला होता. आता ९९ रुपयाचा प्लान जास्तीत जास्त सर्कलमधून काढून टाकला जात आहे. तसेच नवीन एन्ट्री लेवलचा प्लान १५५ रुपयाचा प्लान उपलब्ध करून दिला जात आहे.

वाचाः POCO M4 Pro 5G स्मार्टफोनवर मिळतोय मोठा डिस्काउंट, पाहा ऑफर

Airtel 155 Plan Details

एअरटेलचा ९९ रुपयाचा एन्ट्री लेवलचा प्लान २८ दिवसाच्या वैधते सोबत येतो. ज्यात २०० एमबी डेटा सोबत ९९ रुपयाचा टॉकटाइम मिळतो. आता कंपनीकडून बेस प्लानची किंमत ५७ टक्के वाढली आहे. आता या प्लानची किंमत १५५ रुपयाची झाली आहे. या प्लानमध्ये २४ दिवसासाठी अनलिमिटेड कॉलिंग, ३०० एसएमएस, १ जीबी डेटा फ्री दिला जातो. तसेच Wynk Music आणि हेलोट्यून्सचे अतिरिक्त लाभ दिला जातो. हा प्लान त्या लोकांसाठी महाग आहे. जे फक्त सिमला अॅक्टिव ठेवण्यासाठी रिचार्ज करीत होते. जिओ आणि एअरटेल सारख्या दिग्गज कंपन्या आपल्या सध्याच्या प्लानच्या किंमतीत बदल करीत असून त्यात वाढ करीत आहेत.

वाचाः Motorola G62 5G स्मार्टफोनला खूपच स्वस्तात खरेदीची संधी, पाहा डिस्काउंट

वाचाः Poco C55 स्मार्टफोन भारतात लाँच, २८ फेब्रुवारीपासून विक्री, डिस्काउंट-ऑफर मिळणार

Source link

Airtel Planairtel plansAirtel Prepaid PlanAirtel Prepaid Plan Hikeairtel prepaid plans rechargeairtel recharge plans
Comments (0)
Add Comment